घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारात एका निर्जनस्थळी एका झोपडीत गेली तीन दिवसांपासून लपून बसलेला बिबट्या आज वन विभागाने घोटी पोलिसांच्या व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने जेरबंद केला. या बिबट्याला उपचारार्थ पशुवैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारानंतर त्यास जंगलात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारातील भैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या एका पडित झोपडीत गेली तीन दिवसांपासून एक बिबट्या असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती वनविभाग दिली तसेच वन विभागाने घोटी पोलिसांना दिली.याबाबत खातरजमा करण्यासाठी आज वनविभागाचे कर्मचारी आणि घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव हे आज या झोपडीजवळ पोहचले असता, या झोपडीत एक बिबट्या दडून असल्याची बाब निदर्शनास आली. वनविभागाने या बिबट्याला पोलीस व स्थानिक युवकाच्या मदतीने जेरबंद केले.दरम्यान हा बिबट्या आजारी असल्याची बाब समोर आली असून त्याच्यावर पशुवैद्यकीय रूग्णालयात उपचार करून त्यास सुरक्षितस्थळी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
तीन दिवस झोपडीत मुक्काम ठोकणारा बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 6:01 PM
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारात एका निर्जनस्थळी एका झोपडीत गेली तीन दिवसांपासून लपून बसलेला बिबट्या आज वन विभागाने घोटी पोलिसांच्या व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने जेरबंद केला.
ठळक मुद्देघोटी पोलीस, वनविभागाची कामगिरी; स्थानिक नागरिकांचे सहकार्र्य