पंचवटी : म्हसरूळ (बोरगड) एकतानगर येथील नितीन दिलीप परदेशी (२५) या युवकाच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून खून करणाऱ्या फरार संशयितांना म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे. म्हसरूळ-मखमलाबाद लिंकरोडवरील वेदश्री सोसायटीत राहणारा विजयकुमार पुंडलिक गांगोडे (२४), एकतानगर, जुई एकता अपार्टमेंट येथील मयूर राजाभाऊ जाधव (२३), तसेच चाणक्यपुरी येथील वेदांत ब सोसायटीतील हितेश ऊर्फ चिक्या रवींद्र केदार (२४) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़ गत बुधवारी (दि़६) रात्री एकतानगर साती आसरा मंदिराजवळ गोळीबाराची घटना घडली होती़साती आसरा मंदिराजवळील लोखंडी बाकड्यावर मयत परदेशी हा बसलेला होता तर त्याचे सहकारी मद्यपान करीत होते. मद्यपान आटोपल्यावर सहकारी निघून गेले व परदेशी हा एकटाच बसलेला होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्याकाही संशयितांनी हातातील पिस्तुलातून परदेशीच्या डोक्यातगोळी झाडल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. याघटनेची माहिती मिळाल्यानंतरजखमी परदेशीचा भाऊ विशाल व त्याच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान परदेशीचा मृत्यू झाला़म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांना संशयितांची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, किशोर रोकडे, राजू टेमघर, सुरेशमाळोदे, संदीप भांड, मंगेश दराडे,उत्तम पवार आदींनी संशयितांनाअटक केली. यातील गांगोडेयाला दिंडोरी तालुक्यातील छोटी करंजाळी येथून, तर उर्वरित जाधव व केदार यांना पेठरोडवरून ताब्यात घेतले़दरम्यान, पोलिसांनी संशयितांना अटक केली असली तरी परदेशी याचा खून का केला याचे कारण गुलदस्त्यात आहे़ दरम्यान, पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
बोरगड येथील युवकाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 1:38 AM
पंचवटी : म्हसरूळ (बोरगड) एकतानगर येथील नितीन दिलीप परदेशी (२५) या युवकाच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून खून करणाऱ्या फरार संशयितांना म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे.
ठळक मुद्दे खुनाचे गूढ कायम उर्वरित संशयित फरार