शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

बस मोटारसायकल अपघातात तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2023 10:59 AM

याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- गणेश शेवरे

पिंपळगाव बसवन्त (नाशिक) - चांदवडच्या दिशेने भरधाव वेगाने  पिंपळगावकडे येणाऱ्या बसने मोटारसायकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील तीन युवकांचा डोक्याला, हाताला व पायाला गंभीर  दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, महेश चंद्रकांत निफाडे, सुभाष माणिकराव निफाडे आणि नितीन भास्कर निफाडे राहणार तिघेही शिरवाडे वणी फाट्यावर हे उभ्या असलेल्या हिरो पॅशन प्रो कंपनीची मोटार सायकल क्रं. एम एच MH- 17BR-7972 जवळ उभे होते. तेव्हा  चांदवड  बाजूकडून पिंपळगावच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या एस. टी. बस क्रमांक एम एच-२० बी.एल -२४६१  ने मोटार सायकलला जोरदार ठोस मारली.  अपघातात महेश चंद्रकांत निफाडे,सुभाष माणिकराव निफाडे आणि नितीन भास्कर निफाडे यांच्या डोक्यास, छातीस, हातापायास, गंभीर दुखापत झाल्यावर त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यावर तात्काळ रुग्णवाहिकेतून प्रथमेश पावले यांनी जखमींना पिंपळगाव रुग्णालयात प्राथमिक रुग्णाल दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. शवविच्छेदन  करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. 

या अपघाताचा पिंपळगाव पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर कारभारी निफाडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बस चालक दिपक शांताराम पाटील (राहणार धरनगांव, जिल्हा जळगाव) हा दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत असून अपघाताची माहिती न देता पळून गेला. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलीस हवलदार शांताराम निंबेकर करत आहेत.--------सदर घटना झाल्यानंतर शिरवाडे वणी येथील गावकऱ्यांनी शिरवाडे फाट्या येथे मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा दिला आहे. या ठिकाणी  मोठ्या प्रमाणात सुरवाडी येथील नागरिक जमा झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात