पाटोदा : खरीप हंगाम भांडवल तसेच घरखर्चासाठी चार पैसे मिळतील या आशेवर चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यास कवडीमोल दर मिळत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कितीतरी पटीने तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच गेल्या काही दिवसात वातावरणातील बदलामुळे तसेच पावसामुळे साठवून ठेवलेल्या कांद्यास पाणी लागल्याने चाळीतील हजारो क्विंटल कांदा सडून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव तो उकीरडयावर फेकून द्यावा लागत आहे. शासनाने हमी भावाने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यात शेतकरी नगदी पिक म्हणून कांदा पिक मोठया प्रमाणात घेतात. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. पोळ कांदा व कांदा रोपे शेतातच सडले. त्यामुळे चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्यास पंधरा हजार रु पयांपर्यंत दर मिळाला त्यामुळे अनेक शेतकºयांना मोठा फायदा झाला. आॅक्टोबर महिन्यातील या पावसाने शेतातील विहिरींना तसेच बोअरवेल्स आणि साठवण तलाव भरल्यामुळे शेतीसाठी मोठया प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. या पाण्याच्या भरोशावर शेतकरी वर्गाने नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्यात शेतात हजारो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केल. त्यासाठी एकरी सुमारे साठ ते सत्तर हजार रु पये खर्च केला. मात्र फेब्रुवारी महिन्यात आलेल्या बेमोसमी पावसाने उत्पादक शेतकºयांचा घात केला. या पावसाचे पाणी पोग्यात गेल्याने साठवण क्षमता शेतात असतानाच कमी झाली. त्यामुळे अनेक शेतकºयांनी कांदा साठवून न ठेवता विक्र ी करण्यास सुरु वात केली. त्यात कोरोना महामारीने लॉकडाऊनची भर पडली. त्यामुळे शेतकºयांना कांदा बाजारपेठेत विक्र ी करण्याची संधी मिळाली नाही. परिणामी कांदा साठवून ठेवण्याशिवाय शेतकºयांपुढे पर्याय नव्हता. शेतकरी वर्गाने कांद्याची टिकवण क्षमता टिकवून ठेवणाºया विविध प्रकारची औषधे तसेच पावंडर टाकून कांदा साठवून ठेवला.कांदा दरात घसरणअभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात सप्ताह भरात कांद्याच्या भावात दीडशे रु पयांनी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. शनिवारी(दि.१८ )३८६ ट्रॅक्टर्स द्वारे १० हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन भाव किमान ३०० ते कमाल ९२० रु पये तर सरासरी ७०० रूपये मिळाला. दरम्यान,उशीरा झालेली कांदा लागवड तसेच वातावरणातील बदलाचा फटका यंदा साठवलेल्या कांद्यावर झाला असून चाळीतील कांदा सडू लागल्याने शेतकºयांनी कांदा मोठया प्रमाणावर विक्र ीसाठी आणण्यास सुरु वात केली आहे.-------------------------------खत म्हणून वापरउन्हाळ कांद्याची लागवड साधारणपणे नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत केली जाते. मात्र मागील वर्षी उन्हाळ कांद्यास मिळालेला दर पहाता शेतकरी वर्गाने मार्च अखेर पर्यंत कांदा लागवड केली. उत्पादित झालेला कांदा चाळीत साठवून ठेवला मात्र हा कांदा अल्पावधीत सडून गेला. त्यामुळे सडलेला कांदा शेतकºयांना उकीरड्यावर फेकून द्यावा लागत असून त्याचा खत म्हणून वापर करावा लागत आहे.------------------------------खरीप हंगामासाठी बी बियाणे तसेच रासायनिक खतांसाठी भांडवल म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागला आहे. जो कांदा चांगला आहे त्यालाही कवडीमोल भाव मिळत आहे. केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने नुकसान सहन करावे लागत आहे. सडलेला कांदा उकिरड्यावर फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. भाव मिळत नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने शेतकºयांचा खरेदी करून दिलासा द्यावा.- राजेंद्र पोकळे, शेतकरी पाटोदा
कांदा फेकला उकीरड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 8:27 PM