मालेगाव : चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंग गडावर जाणाऱ्या भाविकांच्या डीजेवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जुना मुंबई-आग्रा महामार्गावर फारान हॉस्पिटलजवळ घडली. यात एका भाविकाचा मोबाइल लंपास झाला, तर एका भाविकाच्या मोबाइलची तोडफोड केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कृषिमंत्री दादा भुसे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.दरम्यान, यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी येथील छावणी पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको करीत गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी बंदोबस्त नियुक्त करावा, अशी मागणी केली. यावर पोलीस प्रशासनाने यावर तातडीने राज्य राखीव पोलीस दलासह स्थानिक पोलीस यंत्रणा कार्यरत केली जाईल, तसेच डीजेवर दगडफेक व मोबाइल चोरणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली होती. दगडफेकीचे वृत्त पसरताच काही काळ तणाव निर्माण झाला होता. छावणी पोलिसात कृषिमंत्री दादा भुसे यांनी अपर पोलीस अधीक्षकांना पाच-सहा दिवस तातडीने बंदोबस्त वाढविण्याची सूचना केली. छावणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपर पोलीस अधीक्षक खांडवी यांनी दगडफेक करणाऱ्या संशयितांना जेरबंद करण्याचे आश्वासन दिले.पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजीछावणी पोलीस ठाण्यासमोर जमाव जमल्याने घोषणाबाजी सुरू होती. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची भुसे यांनी समजूत काढली. दरम्यान, कृषिमंत्री भुसे यांनी चैत्रोत्सवात गडावर भाविक जात असल्याने यात मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात यावी. पोलीस बंदोबस्त वाढवावा, पेट्रोलिंग आणि रात्रीची गस्त वाढवावी. दरेगावपासून फारान हॉस्पिटलपर्यंत काही ठिकाणी पथदीप बंद असल्याने अंधार असतो. तेथे पथदीप बसवावेत. रस्त्याचे काम पाच दिवस बंद ठेवावे. पोलीस कुमक वाढवावी, अशा सूचना केल्या. पोलीस बंदोबस्त वाढवून मार्गावर रात्रीची पेट्रोलिंग करण्यात येईल, असे अपर पोलीस अधीक्षक खांडवी यांनी सांगितले.
मालेगावी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या डीजेवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 11:21 PM
मालेगाव : चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंग गडावर जाणाऱ्या भाविकांच्या डीजेवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जुना मुंबई-आग्रा महामार्गावर फारान हॉस्पिटलजवळ घडली. यात एका भाविकाचा मोबाइल लंपास झाला, तर एका भाविकाच्या मोबाइलची तोडफोड केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ठळक मुद्देतणावपूर्ण स्थिती : हिंदुत्ववादी संघटनांचा रास्ता रोको; बंदोबस्तात वाढ