आज रिअॅलिटी चेक : प्रशासनाची होणार झाडाझडती
नाशिक : शहरात आधीच डेंग्यूने थैमान घातले असताना ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि अनियमित घंटागाडीची सर्वत्र होत असलेली ओरड यामुळे महापालिकेत महापौरांनी बोलाविलेल्या बैठकीत तंटा झाला.एकेका प्रभागात पाच ते सात घंटागाड्या आणि कचरा उचलणारी वाहने असल्याच्या दाव्यावरून नगरसेवकच बुचकळ्यात पडले. अखेरीस प्रशासनाच्या आकडेवारीनुसार बुधवारी प्रभागा प्रभागात नगरसेवकांनी प्रत्यक्ष गाड्या बोलवून रिअॅलिटी चेक करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाड्या तपासा आणि आकडेवारी खरी नसेल तर थेट मला फोन करा, असे आव्हान देत महापौर रंजना भानसी यांनी आरोग्याधिकाºयांवर टांगती तलवार ठेवली आहे.शहरातील रोगराईच्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी तातडीने स्थायी समितीच्या दालनात अधिकारी आणिसर्व सभापती तसेच नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी घंटागाडीच्या विषयावरून नगरसेवक अधिकाºयांवर तुटून पडले. घंटागाड्या किती आहेत, त्या प्रभागात केव्हा येतात,...तर आरोग्याधिकाºयांवर कारवाईयानंतर आता बुधवारी प्रभागा प्रभागातील घंटागाड्यांची यादी घेऊन नगरसेवक खरोखरीच इतक्या गाड्या आहेत काय आणि त्याची तपासणी करण्यासाठी खास मोहीम राबविण्यात येणार असून जर इतक्या गाड्या आढळल्या नाही तर आरोग्याधिकाºयांवर कारवाईची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे.