लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लॉकडाऊनच्या काळात नाशिक शहर परिसरात विविध रंगांचे आणि विविध प्रकारचे पक्षी दिसून आले असून, तब्बल २५ वर्षांनंतर नाशिकजवळ ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर अर्थात तिबोटी खंड्या हा पक्षी आढळून आल्याचा दावा येथील पक्षिमित्र नचिकेत ढवळे, अभिजित सोनवणे, प्रसाद सोनवणे यांनी केला आहे. हा पक्षी २५ वर्षांपूर्वी वनविभागाच्या कर्मचाºयाला दिसला होता, पण त्याची नोंद उपलब्ध नाही.नाशिकचा गोदाकाठ, इथली थंड हवा, रम्य निसर्ग आणि शांत जीवन यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर परप्रांतातील लोकही रहिवासासाठी नाशिकला प्रथम पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. विविध प्रजातींच्या परदेशी पक्षांनाही नाशिकच्या निसर्गाने मोहिनी घातली आहे. गंगापूर, नांदूरमधमेश्वर परिसरात पर्यटनाला येणारे काही पक्षी नाशकातच घर करू लागल्याचे दिसतय. नचिकेत ढवळे, अभिजित सोनवणे, प्रसाद सोनवणे या पक्षिमित्रांच्या चमूने नाशिक परिसरात स्वच्छंदपणे विहार करणाºया दुर्मिळ असणाºया पक्षांचा माग काढला आहे. लॉकडाऊनच्या काळात या चमूला विविध रंगी विविध प्रजातींचे पक्षी दिसून आले. त्र्यंबकभागात केलेल्या भटकंतीत त्यांना आजपर्यंत न आढळलेला ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर अर्थात तिबोटी खंड्या हा पक्षी आढळून आला. किंगफिशर कुळातील हा छोटेखानी पण देखणा पक्षी सामान्यत: पश्चिम घाट, कोकण किनारपट्टीच्या भागात आढळून येतो. थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया आदी देशांत या पक्षाचा विपूल प्रमाणात वावर आढळतो. जेमतेम वितभर लांबीचा चकचकीत निळसर काळ्या पंखांचा, लाल जांभळट पाठीचा तर पोटाजवळ पिवळा आणि लाल, केशरी चोचीचा हा तिबोटी खंड्या नाशिकच्या परिसरात सखलभागात अंडी घालायला आलेला आढळून आला आहे. त्र्यंबकेश्वर-हरसूल रस्त्यावरील जंगली भागात असलेल्या एका धबधब्याजवळ त्यांना हा पक्षी उडत असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी त्याचा माग काढला, असे अभिजित सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. देशात नाशिकचे हवामान दुसºया क्रमांकावरयापूर्वीदेखील या चमूला भुतान, चीन आदी देशांतून भारतमार्गे श्रीलंका, मलेशिया या देशात स्थलांतर करणारा अमूर फाल्कन हा ससाणा पक्षी आढळला होता. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातच काय पण संपूर्ण भारतात नाशिकचे हवामान दुसºया क्र मांकावर आले आहे. त्यामुळे निरिनराळ्या पक्षांसाठी नाशिक डेस्टिनेशन अग्रस्थानी आलेले दिसते मागील दोन-तीन वर्षांपासून आम्ही पक्षीनिरीक्षण करत आहोत. यापूर्वी नाशिकमध्ये प्रथमच आम्हाला लांडगा दिसला होता. सध्या पक्षांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे नाशिकमध्ये तिबोटी खंड्या या पक्षांची किमान २० ते ३० पर्यंत संख्या असू शकते. याचा अधिक शोध घ्यायला हवा.- अभिजित सोनवणे, पक्षिमित्र, नाशिक
नाशिकमध्ये २५ वर्षांनंतर दिसला तिबोटी खंड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:44 PM
नाशिक : लॉकडाऊनच्या काळात नाशिक शहर परिसरात विविध रंगांचे आणि विविध प्रकारचे पक्षी दिसून आले असून, तब्बल २५ वर्षांनंतर नाशिकजवळ ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर अर्थात तिबोटी खंड्या हा पक्षी आढळून आल्याचा दावा येथील पक्षिमित्र नचिकेत ढवळे, अभिजित सोनवणे, प्रसाद सोनवणे यांनी केला आहे. हा पक्षी २५ वर्षांपूर्वी वनविभागाच्या कर्मचाºयाला दिसला होता, पण त्याची नोंद उपलब्ध नाही.
ठळक मुद्देपक्षिमित्रांचा दावा : यापूर्वी वनविभागाच्या कर्मचाऱ्याला आढळलेल्या पक्षाची कुठेही नोंद नाही