पिंपळगाव बसवंत : विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर सात्वीक आहार घ्यावा. दररोज ध्यान धारणा, मंत्र जाप करून विवेकशील गुण आत्मसात करावा असे विचार युवा संत डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांनी ‘युवक कल्याण’ या विषयावर व्यक्त केले.येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणीज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर नारायण टेंभे येथे सुरू आहे. शिबिरात ग्रामस्वच्छतेसह विवीध उपक्रम सुरू आहे. यावेळी गुट्टे म्हणाले, विद्यार्थ्यासाठी प्रत्येक क्षण महत्वाचा असुन त्याचा सर्वानी सदपयोग करावा. विद्यार्थ्यानी हसतमुख राहून जीवनातील घडामोडींना सामोरे जावे आवाहन डॉ.गुट्टे यांनी केले. शिबिरात मविप्र संस्थेच्या जनशिक्षण संस्थान तर्फे गावातंील महिला आणि स्वयंसेविकांना रांगोळी व मेहंदी प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाचे उदघाटन नारायणटेंभीचे उपसरपंच अजय गवळी, बाळासाहेब गवळी यांच्या हस्ते झाले. यावेळी जनशिक्षण संस्थेचे अधिकारी प्रकाश नाठे, प्रा. अभिजीत पवार, काजल नायक, प्रा. ज्ञानोबा ढगे, प्रा. ए. ए. देशमुख, उमा कुलकर्णी, भारती सोनवणे, कांचन लोखडे उपस्थित होते. दिले. (वार्ताहर)
वाघ महाविद्यालयाचे शिबीर
By admin | Published: January 12, 2015 1:02 AM