लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील वंचित आदीवासी बांधवांना जातींचे दाखले मिळवून दिले जात असतांना, आता या बरोबरच शिधा पत्रिका मिळवून देण्याचाही उपक्र म राबविला जात आहे. या उपक्र मांर्तगत तालुक्यातील पुरणगाव येथील ज्ञानेश्वर वाघ यांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्रथमच शिधा पत्रिका मिळाली आहे.येवला पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी सभापतीपदाचा पदभार स्विकारल्यापासून ‘शासन आपल्या दारी’, हा उपक्र म हाती घेतला आहे.पुरणगाव येथील ज्ञानेश्वर वाघ गेल्या दोन वर्षापासून तहसील कार्यालयात शिधापत्रिकेसाठी चकरा मारून थकले होते. गायकवाड यांनी पाठपुरावा करत ज्ञानेश्वर मोरे यांना जातीचा दाखला, मुलांचे जातीचे दाखले, शिधा पत्रिका मिळवून दिले.यावेळी बाळू पवार, सचिन कुराडे, महेश उगावकर, खंडू बहीरम, साईनाथ गाडे, रमेश शेळके, दत्तु शेळके, श्रावण काळे, सुरेश शिंदे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.(फोटो०८वाघ)
पुरणगावच्या वाघ यांना मिळाली चाळीसाव्या वर्षी शिधा पत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 7:06 PM
येवला : तालुक्यातील वंचित आदीवासी बांधवांना जातींचे दाखले मिळवून दिले जात असतांना, आता या बरोबरच शिधा पत्रिका मिळवून देण्याचाही उपक्र म राबविला जात आहे. या उपक्र मांर्तगत तालुक्यातील पुरणगाव येथील ज्ञानेश्वर वाघ यांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्रथमच शिधा पत्रिका मिळाली आहे.
ठळक मुद्दे ‘शासन आपल्या दारी’, हा उपक्र म