ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील मारूतीचा मोडा परिसर व आडवाडी रोडलगत असलेल्या बेल टेकडी परिसरात दिवसाढवळया बिबट्याचा वावर वाढल्याने दहशत निर्माण झाली आहे.वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बदोबस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.येथील मारूतीचा मोडा परिसरात जंगलात वृक्षाचे प्रमाण जास्त असल्याने या भागात वन्यप्राण्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा आहे. परिसरातील डोंगरवर गेल्या दोन महिन्यापासून पाण्याचा एक थेंबही नसल्याने जंगलातील वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी मानवी वस्तीकडे येत आहे. जंगलातील मोर, बिबटे, तरस, लांडगे आदी वन्य प्राणी दिवसाही पाण्याच्या शोभार्थ मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहे. शेतकरी व शेतमजूर शेतात काम करतांना आपला जीव मुठीत धरून काम करताना दिसत आहे. मोडा परिसरातील शिवाची नळी परिसरात बिबट्याचे दिवसाही दर्शन होत आहे. या भागात मोरांचे प्रमाण जास्त असून बिबट्याचे याभागात नेहमीच वास्तव्य असते. जास्त रोजदांरी देवूनही मजूर या भागात कामासाठी जाण्याचे धाडस करीत नाही. आडवाडी रोडलगत बेल टेकडी परिसरात डोंगराला कपार असल्याने कपारीत बिबटयाचे वास्तव्य आहे. उन्हाच्या तीव्रतेने बिबट्यांना पाण्याच्या शोधार्थ जंगलातून बाहेर यावे लागत आहे. वनविभागाच्यावतीने या दोन्ही ठिकाणी पिंजरे लावून बिबटयाचा बदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहे.
ठाणगाव परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 5:47 PM