नाशिक : सूर्याच्या उत्तरायणाने तीळ-तीळ वाढत जाणारा दिवस जेव्हापासून सुरू होतो तो मकरसंक्रातीचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वानी एकमेकांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा देत ह्यतीळगूळ घ्या, गोड गोड बोलाह्ण, असा स्नेहमय संदेश देऊन नाते वृद्धिंगत आणि दृढ करण्यासाठी तीळगुळाचे वाटप करून स्नेह भेट घेतली.भारतीय संस्कृतीत मकरसंक्रात या सणाला महत्त्वाचे स्थान आहे. इंग्रजी महिन्यांनुसार वर्षातील पहिला सण मकरसंक्रात असल्याने याप्रती असलेली उत्सुकता दिसून आली. हिवाळा ऋतूत हा सण येत असल्याने शरीराला उष्णतेची गरज भासते. त्यामुळे या दिवशी तीळ-गूळ देऊनच शुभेच्छा देण्याची प्रथा रुजली आहे. शहरातही पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात ही प्रथा साजरी करीत संक्रातीचा सण नाशिककरांनी उत्साहात साजरा केला. मकर संक्रातीला एकमेकींना वाण देण्यासाठी सुवासिनींना या सणाचे खास आकर्षण असते. नवी कोरी कोळ्या रंगाची साडी परिधान करून गृहिणींना सुगड पूजने केले. तसेच सुगडय़ाचे वाण देण्याची पारंपरिक प्रथा त्यांनी पार पाडली. महिलावर्ग संक्रातीपासून रथसप्तमीर्पयत साजरी केल्या जाणाऱ्या हळदी-कुंकवाच्या प्रथेला यादिवसापासून सुरु वात केली. अनेक महिलांनी संक्रांतीच्या दिवशीच हळदी-कुंकवाचेही नियोजन करून कौटुंबिक उत्सव साजरा केला.
सामाजिक एकात्मतेचे आवाहनमकर संक्रांतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या जातीधर्माच्या मित्रमंडळींनी एकत्र येत या सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणो या सणाच्या निमित्ताने निर्माण झालेला सामाजिक सद्भाव कायम टिकून राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच एकत्र येणाऱ्या मित्रमंडळींनी एकमेकांना यापुढेही सामाजिक एकात्मता अशीच टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. गेल्या काही दिवसांत घडलेल्या अनपेक्षित घटनांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या समाजांच्या मित्रांनी एकत्र येऊन एकमेकांना तीळगूळ दिल्याने या सणातील गोडवा आणखीच वाढला आहे.