नाशिक : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा बहुतांशी शेतकºयांना लाभ झालेला नसल्याचे पाहून सरकारने आता या योजनेत आणखी बदल करून ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत कर्ज घेतले असेल व त्याची परतफेड केली नसेल अशा शेतकºयांचाही योजनेत समावेश करून त्यांनाही दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात नाशिक जिल्हा बॅँकेने थकबाकीदार शेतकºयांना या योजनेत समाविष्ट होण्यासाठी आवाहन केले असून, त्यात म्हटले आहे की, ज्या शेतकºयांनी २००१ ते २००९ पर्यंत उचल केलेल्या पीक, मध्यम मुदत कर्जाची परतफेड केली नसेल व ज्या शेतकºयांना ३० जून २०१६ पर्यंत कर्जमाफी देण्याचा शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा झाला नसेल अशा शेतकºयांनाही आता शेतकरी सन्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. २००१ ते २००९ पर्यंत घेतलेले व थकीत झालेले दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकºयांनी या संदर्भात जिल्हा बॅँकेशी संपर्क साधावे, असे आवाहन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी केले आहे. शासनाने २०१६-१७ या वर्षात ज्या शेतकºयांनी कर्ज घेतले, परंतु त्यांनी परतफेड केली नाही, अशा थकबाकीदार शेतकºयांच्या कर्जावर ११ ते १२ टक्के व्याजाची आकारणी केली जात आहे. अशा शेतकºयांनी थकबाकी भरल्यास त्यांना फक्त ६ टक्के व्याजाची आकारणी करण्याचे आदेश शासनाने जिल्हा बॅँकांना दिले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी कर्ज भरून व्याजाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केदा अहेर यांनी केले आहे.
२००९ पर्यंत थकीत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:19 AM