सटाणा : तालुक्यातील देवळाणे परिसरात बेसुमार वृक्षतोड सुरू असून, तक्रार करूनही वनविभाग याकडे डोळेझाक करत असल्याची ओरड ग्रामस्थांकडून होत आहे.बागलाण तालुक्यातील देवळाणे परिसरात मोठ्याप्रमाणात राखीव वनक्षेत्र आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्ष लागवड केली आहे.या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वनतळे केल्यामुळे परिसरात चंदनासह निंब, चिंच, बाभूळ, अंजन, वड, पिंपळ, आंबे आदी डेरेदार वृक्ष आहे. या जंगल संवर्धनसाठी गावकऱ्यांनी चराई बंदी, कुºहाड बंदी लागू केली आहे. यामुळे आज मोठ्याप्रमाणात वन संपदा बघायला मिळत असताना लाकूड तस्करांनी आता डोकेवर काढल्याने वन संपदा धोक्यात आली आहे. राजरोसपणे येथील डेरेदार वृक्षाची कत्तल करून त्याची तस्करी केली जात आहे. याबाबत वनविभागाकडे अनेकवेळा तक्र ारी केल्या मात्र त्याकडे डोळेझाक केली जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.गावकऱ्यांनी मोठ्या कष्टातून जंगल उभे केले आहे. परंतु स्थानिक वनसमितीच्या कृपाशीर्वादाने या जंगलाचा डोळ्यादेखत सफाया होताना दिसत आहे. वनसमिती, अधिकारी आणि तस्कर यांच्या या त्रिकुटामुळे चंदनासारखी दुर्मीळ आणि महागडी वृक्षदेखील राजरोस कत्तल करून मालेगावकडे त्याचा अवैध व्यवसाय केला जात असल्याचेदेखील ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे.
देवळाणे परिसरात लाकडांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 11:01 PM
देवळाणे परिसरात बेसुमार वृक्षतोड सुरू असून, तक्रार करूनही वनविभाग याकडे डोळेझाक करत असल्याची ओरड ग्रामस्थांकडून होत आहे.
ठळक मुद्देवनविभागाची डोळेझाक : बेसुमार वृक्षतोड होत असल्याची तक्रार