पंचवटी : मागील चार ते पाच महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे वर्चस्व असल्याने यंदाच्या पंचवार्षिक निवडणूकीत महापौर, स्थायी समिती, गटनेत्यासह सर्व मानाची पदे याच प्रभागात आहेत. त्यामुळे आता भाजपचा गड मानला जात असल तरी बदलणाऱ्या संभाव्य प्रभाग रचनेत मात्र या गडावर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या महाविकास आघाडीसह मनसे धडक देणार आहे. त्यामुळे भाजप गड राखेल की नाही याची यंदा उत्कंठा आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा मानल्या जाणाऱ्या म्हसरूळ भागात काही ग्रामीण भागाचा देखील समावेश होतो. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत गणेश गिते, अरुण पवार, रंजना भानसी, पूनम धनगर या सर्व भाजप उमेदवारांनी निर्विवाद विजय मिळवला. नगरसेवक बलदंड असले तरी प्रभागात समस्या कमी नाहीत. दाट लोकवस्ती उच्चभ्रू वसाहत काही ठिकाणी झोपडपट्टी भाग असलेल्या प्रभागातील नागरिकांना आजही रस्ते पिण्याचे पाणी स्वच्छता यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रभागात एक सदस्य प्रभाग रचनेत यापूर्वी काँग्रेस तसेच मनसेच्या लोकप्रतिनिधींना देखील संधी मिळाली होती मात्र, गेल्या निवडणुकीत भाजपची लाट महत्त्वाची ठरली. यंदा एक सदस्य प्रभाग कायम राहिल्यास काही विद्यमान लोकप्रतिनिधींना अडचण होऊ शकते.
गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपला लढत दिली होती. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मनसेला व थोड्याबहुत प्रमाणात शिवसेनेला भाजपशी लढत देण्यासाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागेल. त्यातच भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्यास नाराजीचा फटका भाजप उमेदवाराला बसू शकतो.
इन्फो बॉक्स
प्रभागातील महत्त्वाच्या
- झोपडपट्टीचा भाग असलेल्या प्रभागात आजही पिण्याचे पाणी नाही.
-झोपडपट्टी भागात आरोग्याच्या प्रश्न कायम आहे.
- लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनांची सरबत्ती केली
- विकासकामे करताना भेदभाव केला गेला असल्याचा आरोप आहे.
इन्फो बॉक्स
संभाव्य उमेदवार
भाजप- गणेश गिते, रंजना भानसी, अरुण पवार, प्रवीण जाधव, राहुल पवार, अमित घुगे, दीपाली गिते, राजू थोरात, प्रसाद सानप, हेमंत आगळे,
शिवसेना- गणेश चव्हाण, विशाल कदम, सविता म्हस्के, सुनील निरगुडे, तुषार भोसले
राष्ट्रवादी- गणेश पेलमहाले, दीप्ती हिरवे, रवी गायकवाड,
मनसे-सोमनाथ वडजे,
काँग्रेस- नीलेश उखाडे
इतर- दत्ता सानप, भाऊसाहेब नेहरे,
इन्फो बॉक्स
प्रभागात केवळ रस्ते डांबरीकरण कामे झाले त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची ठोस कामे नाही. सीतासरोवर या धार्मिक स्थळाचा विकास नाही. अनेक मोकळे भूखंड असून त्याठिकाणी एखादा प्रकल्प उभा करता आला असता मात्र तसे काम नाही. महापौर, स्थायी समिती सभापती पदे मिळाली मात्र प्रभागासाठी उपयोग झाला नाही. पाणी, प्रश्न प्रलंबित आहेत.
- गणेश चव्हाण, माजी नगरसेवक