सतत पडणाऱ्या पावसामुळे उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने संतप्त होत येवला तालुक्यातील रायते येथील तरुण शेतकरी शंकर ढिकले यांनी फ्लॉवरचे पीक उपटून फेकून दिले आहे. अक्षरशः शेतकऱ्यांनी पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून फ्लॉवरचे पीक उभे केले केले होते. मात्र केलेला खर्च देखील या शेतकऱ्याचा वसूल न झाल्याने पूर्ण पीक खराब झाल्याने अक्षरच्या उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
येवला तालुक्यातील रायते गावातील तरुण शेतकरी शंकर ढिकले यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये फ्लॉवरचे पीक घेतले होते. हे पीक उभे करण्याकरता अक्षरशा या तरुण शेतकऱ्याने आपल्या पत्नीचे व आईचे मंगळसूत्र गहाण ठेवून भांडवल उभे केले होते. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे पीक पूर्णपणे खराब झाल्याने केलेला उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल होऊ लागल्याने अक्षरशा या शेतकऱ्याने हे उभं फ्लॉवरचे पीक उपटून फेकून दिले आहे. आता गहाण ठेवलेले सोनं कसं सोडवावं असा मोठा प्रश्न या शेतकऱ्यावर पडला आहे. आसमानी संकटाने परत एकदा शेतकरी भरडला गेला आहे.