दिंडोरी : कादवा सहकारी कारखाना उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देणारा कारखाना असल्याने कादवा कारखान्यास ऊस देण्यास जिल्ह्यातील ऊस उत्पादक पसंती देतात; मात्र कादवा कारखान्याची यंत्रसामग्री जुनी झाल्याने व क्षमता कमी असल्याने पुरेसे गाळप करणे यापूर्वी शक्य होत नव्हते. कारखान्याने आधुनिकी- करणाचे काम पूर्ण केले असून, यावर्षी अधिक क्षमतेने गाळप होणार असल्याचे प्रतिपादन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४३ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बॉयलरची पूजा सौ. व श्री. दत्तात्रय सुदामराव देशमुख (लखमापूर) व सौ. व श्री. भिकन माधवराव कोंड (करंजवण) यांच्या हस्ते झाली.श्रीराम शेटे पुढे म्हणाले की, नव्याने मिल, बॉयलर, टर्बाइन, पॅन चिमणी, आॅलिव्हर, क्रिस्टलायझर, व्हेपरसेल, शुगर ग्रेडर आदी मशिनरी बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर्षी अधिक कार्यक्षमतेने गाळप होणे शक्य होणार आहे. जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. भविष्यात इथेनॉल प्रकल्प करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऊस लागवड वाढीसाठी कारखान्याने सीडफार्ममध्ये व्हीएसआय प्रमाणित नवनवीन जातींची साडेपाच लाख ऊस रोपे तयार असून, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लागवड करावी, असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले.यावेळी जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, नरेश देशमुख, बाळासाहेब नाठे, गौतम सुराणा, युनियनचे अध्यक्ष सुनील कावळे, विश्राम दुगजे, आत्माराम जाधव, तानाजी पगार आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, दत्तात्रेय पाटील, मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान, बाळासाहेब जाधव, दिनकर जाधव, शहाजी सोमवंशी, विश्वनाथ देशमुख, बापू पडोळ, शिवाजी बस्ते, सुखदेव जाधव, सुभाष शिंदे, सुनील केदार, सुनील कावळे, संपतराव पाटील, संपतराव कोंड, विलास वाळके, बबनराव देशमुख, रामदास पिंगळ, शिवाजीराव जाधव, अशोक वाघ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले.राज्यातील साखर उद्योग अडचणीतसाखर संघाने विभागवार साखर कारखान्यांच्या बैठका घेत साखर उद्योगपुढील अडचणी जाणून घेतल्या आहेत. साखरेला मिळणाºया कमी भावामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे. एफआरपी देण्यासाठी केंद्र शासन सॉफ्ट लोन देत आहे; परंतु ते कर्ज असून ते सातत्याने वाढत आहे. निर्यात केलेल्या साखरेचे पैसे मिळण्यास विलंब होत असून, परिणामी सबसिडी सोडून द्यावी लागत असल्यामुळे साखर उद्योग अडचणीत आहे. शासनाने साखर उद्योगाला पॅकेज देण्याची गरज असल्याचेही श्रीराम शेटे यांनी सांगितले.
यंदा अधिक क्षमतेने गाळप होणार: श्रीराम शेटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 11:33 PM
कादवा सहकारी कारखाना उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देणारा कारखाना असल्याने कादवा कारखान्यास ऊस देण्यास जिल्ह्यातील ऊस उत्पादक पसंती देतात; मात्र कादवा कारखान्याची यंत्रसामग्री जुनी झाल्याने व क्षमता कमी असल्याने पुरेसे गाळप करणे यापूर्वी शक्य होत नव्हते. कारखान्याने आधुनिकी- करणाचे काम पूर्ण केले असून, यावर्षी अधिक क्षमतेने गाळप होणार असल्याचे प्रतिपादन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.
ठळक मुद्देकादवा साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन