परिसरातील खडी क्रशरला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी शेतकºयांनी केली. धुळीने पिकांना उपद्रव होऊ नये यासाठी प्रकल्पाच्या भोवती १५ मीटर उंचीपर्यंत जीआय सीटचे पत्र्याचे जाळीदार आवरण टाकण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले. समृध्दी महामार्गासाठी शिवडे शिवारात उभारण्यात आलेल्या खडी क्रशरमुळे पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतक-यांनी केल्यानंतर तहसीलदारांनी मंगळवारी तहसील कार्यालयात ठेकेदार व शेतकरी यांची संयुक्त आयोजित केली होती. खडी क्रशर, डांबर प्रकल्प करण्यावर प्रशासनाने ठाम भूमिका ठेवली. तथापि, धुळीमुळे परिसरातील फळबागांचे नुकसान होवू नये यासाठी उपाययोजना करण्यात येतील. पिकांचे नुकसान झाले असल्यास त्याबाबत जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून शेतकºयांना निर्णय कळविण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. समृध्दीसाठी शिवडे येथे क्रशर, डांबर प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. शिवाय बेकायदेशीर ब्लास्टिक केले जात आहेत. धुळीमुळे परिसरातील फळबागा धोक्यात आल्याने हे प्रकल्प अन्यत्र हलविण्याची मागणी शेतक-यांनी केली. तथापि, प्रकल्प तेथेच ठेवण्यात येतील. परंतु, धुळीमुळे पिकांचे नुकसान होवू नये याकरिता उपाययोजना करण्याची भूमिका तहसीलदार गवळी यांनी स्पष्ट केली. क्रशरपासून १५ मीटर अंतरावर जाळी बसविण्यात येणार असून त्यामुळे धूळ अन्यत्र उडणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना महामार्गाचे काम करणाºया बीएससीपीएलच्या कंपनीला करण्यात आल्या. धुळीमुळे सीताफळ, द्राक्ष, आंबा या फळबागांचे नुकसान झाले असल्याची तक्रार शेतक-यांनी केली. याबाबत जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्यासोबत चर्चा करून शेतक-यांना निर्णय कळविण्याचे सांगण्यात आले. बैठकीस रावसाहेब हारक, उत्तम हारक, अरूण हारक, रोहीदास वाघ, लक्ष्मण वाघ, सोमनाथ वाघ, शिवाजी वाघ, गणेश हारक, पोपट सोनवणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
खडी क्रशरमुळे शेती उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 5:10 PM