लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : पोटा-पाण्यासाठी हजारो किलोमीटरवरून गाव सोडून आलेले अनेक कष्टकरी कामगार आणि शेतमजूर कोरोनाच्या भीतीने पुन्हा आपल्या गावांकडे रवाना होताना दिसत आहेत. संचारबंदी, सार्वजनिक वाहन सुविधा उपलब्ध नसताना कष्टकऱ्यांचा घराकडे जाण्याचा हा प्रवास कसा होणार याची काहीच माहिती नसली तरी, आपले कुटुंब, सहकाºयांसह अनेक कष्टकरी आता गावाकडे परतत असल्याचे चित्र आहे. काहींनी तर पायी चालत घर गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना म्हणून केलेल्या लॉकडाउन व संचारबंदीने शहरासह तालुक्यात रोजगारानिमित्त आलेली अनेक कुटुंब, कष्टकरी मजूर, शेतमजूर अडचणीत सापडले आहेत. कष्टकरीवर्गाचे मोठे हाल होत आहेत.विशेष म्हणजे शासन वा शासकीय यंत्रणा यांच्याकडे याबाबत उपाययोजना नसली तरी स्थानिक पातळीवर काही सामाजिक कार्यकर्ते या मंडळींना पोटापाण्यासाठी शिधा देऊन मदत करत आहे ही आशादायक बाब आहे.माणुसकीचा पाझरजिल्हाबंदीसाठी येवला-कोपरगाव महामार्गावरील पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. बाहेरील वाहन तपासताना त्यातील माणसांचीही चौकशी केली जाते. एक ट्रक अहमदनगरकडून मध्य प्रदेशातील तीस-पस्तीस कामगारांना येवल्याकडे घेऊन येत होता. नाकाबंदीवरील पोलिसांना पाहून ट्रकचालकाने सर्वमजुरांना अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरच उतरून दिले. ही बाब येवला नाकाबंदीवरील सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे व पोलीस नाईक राकेश होलगडे यांना लक्षात येताच, त्यांनी येवला शहरात सदर ट्रक थांबवून ठेवला. सुमारे १३ किलोमीटर अंतर पायी चालत आलेल्या मजुरांच्या जथ्याला ट्रकमध्ये पुन्हा बसवून दिले. या दरम्यान, नगरसेवक रजिवानभाई शेख यांनी, या मजुरांच्या खाण्यापिण्याची सोय करून पुढील प्रवासासाठी रोख पैसेही दिले. पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या या माणुसकीने मजूर गहिवरले.शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव (जि. अहमदनगर) येथून राजस्थानकडे पायी निघालेल्या १२ कामगारांना काही कार्यकर्त्यांनी अन्नाची पाकिटे दिली. येवला-कोपरगाव महामार्गावर एन्झोकेम शाळेजवळ राजस्थानी कारागिरांचा जथ्था दिसत होता. चौकशी केली असता, काम नाही त्यामुळे पैसेही नाहीत. उपासमार होत असल्याने पायीच घराकडे निघाल्याचे त्यांनी सांगितले.मजुरांअभावी शेती अडचणीतसरकारने २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे पीक कापणीला आले असतानाही मजूर मिळेनात. येवल्यात गहू, हरभरा, मका, कांदा आदी पिके काढणीला आली आहेत. मजुरीसाठी आलेल्या बाहेरील शेतमजुरांनी घरचा रस्ता धरल्याने व स्थानिक मजूरही घराबाहेर पडत नसल्याने शेतातील पिके काही उभी तर काही पडून आहेत. मजुरांअभावी शेती अडचणीत सापडली असून, त्यात अवकाळीचीही भर पडत आहेत.
कष्टकऱ्यांवर पायी घरी परतण्याची वेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 9:24 PM
येवला : पोटा-पाण्यासाठी हजारो किलोमीटरवरून गाव सोडून आलेले अनेक कष्टकरी कामगार आणि शेतमजूर कोरोनाच्या भीतीने पुन्हा आपल्या गावांकडे रवाना होताना दिसत आहेत. संचारबंदी, सार्वजनिक वाहन सुविधा उपलब्ध नसताना कष्टकऱ्यांचा घराकडे जाण्याचा हा प्रवास कसा होणार याची काहीच माहिती नसली तरी, आपले कुटुंब, सहकाºयांसह अनेक कष्टकरी आता गावाकडे परतत असल्याचे चित्र आहे. काहींनी तर पायी चालत घर गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
ठळक मुद्देयेवला। मजुरांअभावी शेती अडचणीत; माणुसकीचा फुटतोय पाझर