नाशिक : नाशिकमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सवांतर्गत गतवेळी २ लाख ३९ हजार गणेश मूर्तींचे दान स्वीकारणाºया महापालिकेला यंदा फक्त १ लाख ३९ हजार मूर्तींचे दान मिळाले आहे. तथापि, नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जागृती झाल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या मूर्ती बसविण्यात आल्या. या व अन्य मूर्तींची घरोघरी तसेच कृत्रिम तलावात निर्गत केल्याने संख्या घटली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.नाशिकमध्ये १९९७ मध्ये महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विसर्जित मूर्तींचे दान प्रायोगिक तत्त्वावर स्वीकारण्यास सुरुवात केली. पुढे गोदावरी नदीसह अन्य नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका त्यात सहभागी झाली. यानंतर अन्य संस्थाही सहभागी झाल्याने सातत्याने मूर्ती आणि निर्माल्य संकलनात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी २ लाख ३९ हजार मूर्तींचे संकलन करण्यात आले होते.
यंदा मूर्ती दानात लक्षणीय घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 12:47 AM