दत्ता दिघोळे ।नायगाव : यंदा हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकºयांची मोठी निराशा केली आहे. पाण्याअभावी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे शेतकºयांसह शेतमजुरांचेही काम कमी झाल्याने शेतीवर अवलंबून असणारे सर्वच व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नायगाव खोºयात आलेल्या शेकडो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.परतीच्या पावसाची आशा धुसर होत असल्यामुळे येणाºया काळात सर्वांनाच दुष्काळाचे चटके सोसावे लागणार असल्याचे चित्र आहे. जून महिना उजाडण्याच्या आधीपासूनच समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. समाधानकारक पाऊस पडेल या आशेवर बळीराजाने खरिपाची पेरणी केली. टमाटे, कोबी, फ्लॉवर आदी पिकांची मातीमोल भावात विक्री करावी लागली, तर खरिपात शेतकºयांना हमखास आर्थिक आधार देणाºया सोयाबीनचे दाणे भरण्यास सुरुवात होताच पावसाने दडी मारल्याने हजारो एकर क्षेत्रातील सोयाबीन पीक शेतातच करपले. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.शेतकºयांच्या हातात येणारे उत्पन्न तुटपुंजे असल्यामुळे शेतीवर अवलंबून असलेले सर्वच व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार थंडावले असल्याने बाजारात शुकशुकाट पहायला मिळत आहे. संपूर्ण पावसाळ्यात एकही जोरदार पाऊस पडला नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. आगामी काळात पाऊस पडला नाही तर रब्बी हंगामही धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांसह सामान्य नागरिकालाही येणाºया काळात दुष्काळ व पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागणार आहे. (क्रमश:) शासनाने दुष्काळी जिल्हा ठरविण्यासाठी लावलेले निकष कठोर आहेत. हे नियम बघता सिन्नर तालुक्यातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत असतानाही बहुतांशी गावे या निकषामुळे दुष्काळाच्या नुकसानभरपाई व अन्य सुविधांपासून वंचित राहणार असल्याची स्थिती आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचा विचार करून शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याची गरज आहे.- दत्ताराम डोमाड, शिवसेना तालुका उपप्रमुखमागील हंगामात मी अडीच एकर क्षेत्रात सोयाबीनचे पीक घेतले होते. त्यात वीस क्विंटल सोयाबीन झाली होती. यावर्षी तेवढ्याच क्षेत्रात सात क्विंटल सोयाबीन झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादनात मोठी घट निर्माण झाल्याने आर्थिक गणित बिघडले आहे.- संपत गिते, शेतकरी, जायगावसिन्नर तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सोयाबीन सोंगणीच्या कामासाठी कोकणपट्टीतून हजारो मजूर येत असतात. यावर्षी कोकणातही पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने येणाºया मजुरांचे प्रमाणही वाढले आहे; मात्र सोयाबीनचे उत्पादन एकरी पाच ते सहा क्विंटलने घटले आहे. त्यामुळे कोकणातून आलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. अनेक मजुरांना दररोज काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
नायगाव खोऱ्यात शेतमजुरांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 10:51 PM
नायगाव : यंदा हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकºयांची मोठी निराशा केली आहे. पाण्याअभावी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे शेतकºयांसह शेतमजुरांचेही काम कमी झाल्याने शेतीवर अवलंबून असणारे सर्वच व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नायगाव खोºयात आलेल्या शेकडो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
ठळक मुद्देसर्वच व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.