सिन्नर : पंचायत समितीची प्रशस्त इमारत व तितकेच प्रशस्त सभागृह असतांना सभापतींच्या दालनात आढावा बैठक घेण्याची वेळ आली. वाढत्या दुष्काळात बैठकीला अधिकाऱ्यांचाही ‘दुष्काळ’ जाणवू लागल्याने ही वेळ आली की काय असा प्रश्न निर्माण झाला. प्रत्येक बैठकीत पदाधिकारी आपसात भांडतात आणि अधिकाºयांचे फावते असाच काहीसा प्रकार प्रत्येक बैठकीत दिसून येतो. प्रत्येक बैठकीत ‘त्याच सूचना आणि तेच उत्तर’ मिळत असल्याची खंतही सदस्यांनी व्यक्त करुन आपली हतबलता दाखवून दिली.पंचायत समितीची मासिक आढावा बैठक दरवेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृहात होत असते. मात्र यावेळी मासिक आढावा बैठक सभापतींच्या दालनात मोजक्या खुर्च्या व मोजके अधिकारी यांच्या उपस्थितीत झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महिन्याभरापासून आचारसंहिता असल्याने कामे झाली नसतील असा कयास बांधून सदस्यांनीही बैठकीचे गांभीर्य घेतले नसावे. बाह्य विभागाचा धावता आढावा झाल्यानंतर खातेअंतर्गत आढावाही सदस्यांनी आपसात भांडण्यात व चेष्टा-मस्करीत घातल्याने अधिकाºयांनाही बैठकीचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले.
आढावा बैठक सभापतींच्या दालनात घेण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 5:51 PM