नांदगाव : खरीप हंगामात अवकाळीच्या संकटात सापडलेला शेतकरी रब्बीच्या हंगामात झालेले नुकसान भरून काढण्याच्या नव्या उमेदीने कामाला लागला. मेहनतीने चार मिहन्यात शेतात नवे पिक उभे केले आणि अचानक आलेल्या पावसाने त्याचे स्वप्न जमीनदोस्त केले. प्राथमिक अंदाजानुसार ९०० हेक्टर खेत्रातील सुमारे दीड कोटीचे पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आमदार सुहास कांदे यांच्या सूचनेनुसार सर्व शासकीय विभाग पंचनामे पूर्ण करण्याच्या तयारीला लागला आहे. दोन दिवसात नुकसानीचा अहवाल तयार करू असे तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी सांगितले. पंचनाम्याविषयी कोणतीही अडचण आल्यास शेतकर्यांनी आमदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे यांनी केले आहे. माजी तालुका प्रमुख संतोष गुप्ता, जिल्हा मजूर संघाचे संचालक प्रमोद भाबड, पंचायत समतिीचे माजी सभापती सुधीर देशमुख, राजाभाऊ जगताप, सागर हिरे आदी कार्यकर्ते शेतकर्याच्या पंचनामी व इतर अडीअडचणीसाठी कार्यरत आहेत.न्यायडोंगरी ते जातेगावचे वीज उपकेंद्र दरम्यान परधाडी घाटात विजेचे चार खांब वादळात पडल्याने जातेगावचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. जातेगाव उपकेंद्रातून १३ गावे व वाड्या वस्त्या यांना वीज पुरवठा होत असतो.
अवकाळीचा ९०० हेक्टरवरील पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 1:26 PM