कन्हैया कुमार : पंतप्रधान मोदी यांना खुले आव्हान
नाशिक : मी देशद्रोही नाही, पण समजा घटकाभर मी चूक केली तर देशात भाजपाचे सरकार आहे, अठरा राज्यांत याच पक्षाची सत्ता आहे. संसदेत बहुमत आहे, मग ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान माझ्यावर चार्टशीट का दाखल करीत नाहीत, असे खुले आव्हानच जेएनयूमधील युवा नेता कन्हैया कुमार यांनी दिले आहे. देशात तीन लाख कोटींचे काळेधन जमा झाल्याचा दावा पंतप्रधान करतात, मग इतकी रक्कम देशात असताना बुलेट ट्रेनसाठी जपानकडून एक लाख कोटी रुपयांचे कर्ज का घेतले? असा सवालही त्यांनी केला आहे. नाशिकमधील डावे पक्ष आणि आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने येथील लॉन्समध्ये आयोजित केलेल्या संविधान जागर सभेत कन्हैया कुमार बोलत होते. आपल्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला असला तरी तो सत्य नाही. या देशात सत्ताधिकाºयांना जो प्रश्न उपस्थित करतो, तोच देशद्रोही ठरवला जातो, असे सांगून त्यांनी चार्टशीट दाखल करण्याचे आव्हानच भाजपाला दिले. युवकांमध्ये राजकीय जागृती टाळण्यासाठी ही चळवळच संपुष्टात आणण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सरकारच्या विरोधात कोणताही मुद्दा उपस्थित केला की त्याला प्रत्युत्तर देण्याची आणि सामोरे जाण्याची तयारी नसल्याने अशा प्रश्न करणाºयांना राष्टÑद्रोही ठरवले जाते. सध्या नोटबंदी आणि अन्य प्रश्न करणाºयांबाबत संभ्रम निर्माण करण्यासाठी देशभक्त आणि देशद्रोही असा वाद निर्माण केला जात असल्याचे ते म्हणाले.नोटाबंदी आणि जीएसटीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. नोटाबंदीने छोटे व्यापारी, कष्टकरी, उद्योजकांना बर्बाद केले. केवळ बड्या भांडवलदारांना बाजारातील रोकड उपलब्ध व्हावी यासाठीच नोटाबंदी करण्यात आली आहे. देशात महागाई वाढली असताना त्यात जीएसटीची भर पडली आहे. मोदीभक्त आणि भाजपा समर्थकांना महागाई जाणवत नाही काय? असा प्रश्न केलाच पाहिजे असे सांगून कन्हैया कुमार यांनी भ्रष्टाचारपेक्षा बेईमानी या राष्टÑाची प्रमुख समस्या असून, राम मंदिराचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात नत्थुरामाचे मंदिर बांधणारे भाजपाच सर्वांत मोठा बेईमान असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.भ्रष्टाचाराच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचारी शिल्लक ठेवणार नाही, असे सांगितले आज भ्रष्ट नेत्यांना भाजपात घेतले असून, अशावेळी भ्रष्टाचारी शिल्लक राहणारच कसे? असा प्रश्न त्यांनी केला.