शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

तीर्थराज कुशावर्त बंदिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 9:49 PM

तीर्थक्षेत्रातील सर्व दर्शनीय व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आल्याने तसेच लॉकडाउनमुळे शहराच्या सीमादेखील बंद करण्यात आल्याने गावात फक्त अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणारेच लोक दिसून येत आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : उटीच्या वारीवर कोरोनाचे सावट

त्र्यंबकेश्वर : तीर्थक्षेत्रातील सर्व दर्शनीय व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आल्याने तसेच लॉकडाउनमुळे शहराच्या सीमादेखील बंद करण्यात आल्याने गावात फक्त अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणारेच लोक दिसून येत आहे.दोन आठवड्यांपासून भाविकांचा ओघ पूर्णपणे थांबल्याने मंदिरेही ओस पडली आहेत, तर ज्या ठिकाणी स्नानासाठी तुडुंब गर्दी असते, ते तीर्थराज कुशावर्तही बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहे. एरव्ही गर्दीच्या गजबजाटात असणारे त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तीर्थ, गोदावरी उगमस्थान, ब्रह्मगिरी पर्वत, निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर, श्रीस्वामी समर्थ मंदिर श्री गजानन महाराज संस्थान आदी परिसर सामसूम झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतभर लॉकडाउन घोषित करण्यात आले असल्याने त्र्यंबकेश्वरमधील लाखोंची उलाढालही पूर्णपणे थांबली आहे. त्याचा स्थानिक अर्थकारणावर परिणाम झाला आहे. कुशावर्ताभोवती बॅरिकेडिंग करून ते बंद करण्यात आले आहे.दर सोमवारी दुपारी ३ वाजता भगवान त्र्यंबक राजाची पालखी कुशावर्त स्नानासाठी येत असते. तेवढ्या काळापुरती बॅरिकेडींग हटविले जातात. पालखी परत गेल्या नंतर परत बॅरिकेडींग लावले जाते. दरम्यान, येत्या १८ एप्रिल रोजी संत निवृत्तीनाथ महाराज यांची उटीची वारी म्हणजे मिनी निवृत्ती नाथ महाराज यात्रा आहे. या दिवशी संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला थंड सुवासिक उटीचा लेप चढवितात. तर रात्री १० वाजेनंतर उटी उतरवितात. ती उतरवलेली उटी प्रसाद म्हणून भाविक आपल्या गावी घेऊन जात असतात. या यात्रेला जवळपास एक लाख भाविक येत असतात. यंदा मात्र १५ एप्रिलला लॉकडाउन हटवले तरी एकदम गर्दी होण्यास शासन कदापि मान्य करणार नाही. त्यामुळे यंदा उटीच्या वारीवर कोरोनाचे सावट पसरले आहे.

उटीची वारी भरवायची किंवा नाही, याबाबत शासनाच्या आदेशानुसार संस्थान निर्णय घेईल; पण दरवर्षी संजीवन समाधीला उटीचा लेप पारंपरिक पद्धतीने देऊन महापूजा होणारच आहे. त्यासाठी फक्त विश्वस्त मंडळ, पुजारी एवढेच माणसे उपस्थित राहतील. अर्थात शासन काय निर्णय घेईल यावर सर्व अवलंबून असेल.- पवनकुमार भुतडा, अध्यक्ष, संत निवृत्तिनाथ समाधी संस्थान

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेcorona virusकोरोना वायरस बातम्या