शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

अधिकमासाच्या सांगतेनिमित्त  गोदापात्रात तीर्थस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 1:33 AM

नाशिक : अधिकमासाच्या सांगतेनिमित्त अखेरचे पर्व साधण्यासाठी भाविकांनी अधिक ज्येष्ठ अमावास्येनिमित्त दक्षिणवाहिनी गंगा-गोदावरीच्या रामकुंडावर तीर्थस्नानासाठी गर्दी केली होती. यामुळे अवघा रामकुंडाचा परिसर फुलल्याचे चित्र पहावयास मिळाले. अधिकमास हा पवित्र महिना मानला जातो. १६ मेपासून अधिकमासाला प्रारंभ झाला होता. बुधवारी संपूर्ण दिवसभर अमावास्या होती, त्यामुळे हा दिवस अधिकमास समाप्तीचा धरला गेला. ...

नाशिक : अधिकमासाच्या सांगतेनिमित्त अखेरचे पर्व साधण्यासाठी भाविकांनी अधिक ज्येष्ठ अमावास्येनिमित्त दक्षिणवाहिनी गंगा-गोदावरीच्या रामकुंडावर तीर्थस्नानासाठी गर्दी केली होती. यामुळे अवघा रामकुंडाचा परिसर फुलल्याचे चित्र पहावयास मिळाले. अधिकमास हा पवित्र महिना मानला जातो. १६ मेपासून अधिकमासाला प्रारंभ झाला होता. बुधवारी संपूर्ण दिवसभर अमावास्या होती, त्यामुळे हा दिवस अधिकमास समाप्तीचा धरला गेला. ही अमावास्या फलदायी व शुभ असल्याची धारणा आहे. यामुळे बहुतांश महिलांनी वाण दिले. तसेच दानधर्म करत धार्मिक कार्यावर भर दिला. मंदिरांमध्ये पूजा-पाठ, मंत्रजप करताना भाविक दिसून आले. तसेच गोदावरीला भाविकांनी यावेळी दीप अर्पण करत फुले वाहिली. या काळात देवप्रतिष्ठा, विवाह, गृहप्रवेश, मुंज आदी बाबी वर्ज्य मानल्या आहेत. अधिकमासाची मुख्य देवता भगवान विष्णू असल्याचे मानले जाते. भगवान विष्णू यांची कृपी व्हावी यासाठी भाविकांनी या महिन्यात व्रत केले. बत्तासे दान करण्यात आले.  दरम्यान, सकाळपासून रामकुंडावर भाविकांचे मोठ्या संख्येने आगमन होऊ लागले होते. त्यामुळे दुपारपर्यंत भाविकांच्या गर्दीने संपूर्ण रामकुंड परिसर गर्दीने फुलून गेला होता. रामकुंडावर बत्तासे, फुले, दीप विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविकांनी गोदावरीला दीप व फुले अर्पण केली.

टॅग्स :godavariगोदावरी