शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

नांदगाव तालुक्यात तिहेरी हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:24 AM

हिंगणेदेहरे येथील थरारक घटना; माथेफिरूचा हल्ला; वृद्धांचा बळी नांदगाव : तालुक्यातील हिंगणेदेहरे येथे नातवानेच चुलत आजोबासह तिघांची निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना मंगळवारी सकाळी सहा ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. मृतात गावातील अन्य दोघा वृद्धांचा समावेश असून, गावकºयांनी या माथेफीरूस बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेत अन्य दोघे जखमी झाले आहेत. रवींद्र पोपट बागुल (२८) असे हल्लेखोराचे नाव आसून या तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे.

हिंगणेदेहरे येथील थरारक घटना; माथेफिरूचा हल्ला; वृद्धांचा बळी     

नांदगाव : तालुक्यातील हिंगणेदेहरे येथे नातवानेच चुलत आजोबासह तिघांची निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना मंगळवारी सकाळी सहा ते साडेआठ वाजेच्या सुhमारास घडली. मृतात गावातील अन्य दोघा वृद्धांचा समावेश असून, गावकºयांनी या माथेफीरूस बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेत अन्य दोघे जखमी झाले आहेत. रवींद्र पोपट बागुल (२८) असे हल्लेखोराचे नाव आसून या तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे.मुळचा हिंगणेदेहरे येथील रहिवासी रविंद्र बागुल काही वर्षांपासून भिवंडीतील वडापा भागात त्याचा भाऊ प्रवीण बागुल यांच्यासमवेत वास्तव्यास होता. तो येथील कंपनीत कामावर होता. त्याचा विवाह भुसावळ कंडारी येथील विद्या हिच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला. चार दिवस आधी विद्या यांचा मामा वारल्याने हे दाम्पत्य भूसावळ येथे गेले होते. त्यानंतर ते हिंगणे येथे परतले. दरम्यान, संशयित रवींद्र यांचा भाऊ प्रवीण यांच्या सांगण्यानुसार काही दिवसापासून रविंद्र याचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याला सापुतारा जवळील चिखली येथे एका मांत्रिकाकडे उपचारासाठी नेण्यात आले. तिकडून परत येत असतांना गाडीतच त्याने भाऊ प्रवीणचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची समजूत काढण्यात यश आल्यानंतर ते पहाटे हिंगणे येथे पोहोचले. हे दोघे बंधु रात्री काका भावराव बागुल यांच्या घरी झोपले. मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आरडाओरड करत रविंद्र त्याचे चुलत आजोबा केशव कचरू बागुल (६५) यांच्या घरी पोहोचला. ते त्याला समजावून सांगत असतांनाच रवींद्र याने सुरूवातीला त्यांना लाथ मारत जमीनीवर पाडले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात कुºहाड घातली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यावेळी रविंद्र बेभान झाला होता. त्यानंतर रवींद्र याने गावाबाहेरून जाणाºया रस्त्याकडे मोर्चा वळवत दुध घेऊन जाणाºया सुभाष भिमाजी बच्छाव(५५) यांच्यावर हल्ला चढवला. कुºहाडीचा घाव वर्मी बसल्याने बच्छाव यांचाही जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर रवींद्र याने शेतात जात असलेल्या विक्र म मंगू पवार(६०) यांच्यावर हल्ला करत त्यांना यमसदनी धाडले. याआधी त्याने त्याच रस्त्याने जात असलेल्या दोघा ग्रामस्थांवरही हल्ला केला. सुदैवाने हे दोघेही तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांना किरकोळ जखमा झाल्याचे सांगण्यात येते. त्यांची नावे मात्र कळू शकली नाहीत. हे दृश्य पाहून लगतच असलेल्या तांड्यावरच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत रवींद्रला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. या घटनेने वृत्त कळताच गावकरी अक्षरश: सुन्न झाले होते. तिहेरी हत्याकांडाने बराच काळ ग्रामस्थ बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्राथमिक माहितीनुसार या घटनेतील संशयित मनोरु ग्ण असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याने घडविलेल्या निर्घृण हत्याकांडांने गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपाधीक्षक राहुल खाडे, पोलीस निरीक्षक बशीर शेख, सचिन वांगडे, उपनिरीक्षक बालाजी पदमने, विक्र म बस्ते, दिनेश शूळ, रवी चौधरी, पंकज देवकाते, एकनाथ भोईर यांनी भेट दिली.भेदरलेले ग्रामस्थया घटनेत संशयित रवींद्र याने त्याचे चुलत आजोबा केशव बागुल यांच्यावर हल्ला केल्याचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. ते पाहताच ग्रामस्थ प्रचंड घाबरले. त्यांनी घाबरतच घराचे दरवाजे बंद करून घेतले. गावकºयांना तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर ते प्रचंड भेदरल्याने घराबाहेर पडण्यास तयार नव्हते. संशयिताला पकडल्यानंतर व पोलिस गावात दाखल झाल्यानंतर ग्रामस्थ घराबाहेर आले.या घटनेत रवींद्र याने त्याचे आजोबा केशव बागुल यांच्यावर हल्ला केल्याचे दृश्य शहारे आणणारे होते. ते पाहताच ग्रामस्थ प्रचंड घाबरले. गावकºयांना हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर ते भेदरल्याने घराबाहेर पडण्यास तयार नव्हते. संशयिताला पकडल्यानंतर व पोलीस गावात दाखल झाल्यानंतर ग्रामस्थ घराबाहेर आले.