सटाणा : तीर्थक्षेत्र मांगीतुंगी पर्वतावर अखंड पाषाणात कोरण्यात आलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट उंचीच्या विशालकाय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व पंचकल्याणक महामस्तकाभिषेक सोहळ्याला उद्या (दि. ११) रोजी सकाळी १० वाजता ध्वजारोहण करून प्रारंभ होणार आहे. सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. मांगीतुंगी पर्वतावरील मांगीगिरी शिखरावर गेल्या चौदा वर्षांपासून भगवान ऋषभदेव यांची १०८ फुटी अखंड मूर्ती पाषाणात कोरण्याचे काम सुरू होते. त्यामुळे हे ठिकाण जागतिक दर्जाचे तीर्थस्थळ म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून हजारो भाविकांचे आगमन सुरु झाले आहे. भाविकांच्या गर्दीने परिसराला कुंभमेळ्याचे स्वरूप आले आहे. याप्रसंगी खासदार डॉ. सुभाष भामरे उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यासाठी लागणाऱ्या वस्तू तयार करण्यासाठी हस्तिनापुर येथील कारागीरांना पाचारण करण्यात आले आहे. दोन महिन्यापासून वीस कारागीरांनी या ठिकाणी पूजेसाठी दोन हजार चौरंग, आचार्य, मुनिसाठी सिंहासन, माताजींसाठी दोनशे एेंशी तकद, पाट आदी विविध प्रकारच्या दहा हजार वस्तू तयार केल्या आहेत. त्याची मांडणी महल मध्ये करण्यात येणार आहे. येथे येणाऱ्या भाविकांसाठी मांगीतुंगी अंतर्गत वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी दोनशे रिक्षा उपलब्ध केल्या आहेत. भाविकांना दहा किलोमीटरच्या क्षेत्रात कोणत्याही ठिकाणी प्रवास करण्यासाठी पाच रु पये या नाममात्र दारात सेवा पुरविण्यात यणार आहे. (प्रतिनिधी)इन्फो-आज गुरु वारी सकाळी दहा वाजता मांगीगिरी शिखरावर ध्वजारोहण करून सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. ध्वजारोहण चेन्नई येथील सारिका जैन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर पुरोहितांच्या मंत्रघोषात शुद्धीकरण उपक्रमानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी २ वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
आजपासून महामस्तकाभिषेक सोहळा
By admin | Published: February 11, 2016 12:03 AM