निफाड : आषाढी एकादशीसाठी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथून आयोजन करण्यात आले आहे. म्हाळसाकोरे पासुन श्रीक्षेत्र आळंदीपर्यंत वाहनाने मंगळवारी (दि.१७) प्रस्थान होणार आहे. पुढे ही पालखी आळंदी ते पंढरपूर दरम्यान दि.२१ जून पासून पायी निघणार आहे. गेल्या २३ वर्षापासून हा पालखी सोहळा सुरू असून, यात नाशिक, उस्मनाबाद, नांदेड, जालना व बुलढाणा जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. दि. ८ जुलै रोजी ही पायी पालखी पंढरपूर येथे दाखल होणार आहे. या पालखी दरम्यान अनेक भाविकांनी अन्नदान करणार असून अनेकांंनी वस्तुरुपयात दान देखील केले आहे. या पालखीदरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी दिररोज पालखीचे आयोजक भागवतकार स्वामी हनुमंत महाराज शिंदे यांची भागवत कथा होणार आहे.
म्हाळसाकोरे येथून पंढरपूरसाठी दिंडीचे आज प्रस्थान
By admin | Published: June 16, 2014 11:49 PM