नाशिक : प्रकाशाचे पर्व आणि आनंदाची पर्वणी मानल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला रविवारी (दि. ४) वसूबारसची पूजा करून उत्साहात प्रारंभ झाला. सोमवारी (दि. ५) धनत्रयोदशी असून, यानिमित्त धन्वंतरी देवतेचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच घरोघरी धन-धान्य आणि सोने-नाणे यांचीदेखील पूजा करण्याची प्रथा आहे. यादिवशी उपवास करून विष्णू, लक्ष्मी, कुबेर योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी या देवतांचे तसेच नवीन वहीचे पूजन करतात. तसेच अखंड दीप लावून खिरीचा नैवेद्य करण्याचीही प्रथा आहे.धनत्रयोदशीचा मुहूर्तसोमवारी (दि. ५) शके १९४० मिती आश्विन वद्य त्रयोदशीला चार शुभमुहूर्त आहेत. सकाळी ६.३९ ते ८.०३ मिनिटे अमृत मुहूर्त, सकाळी ९.२८ ते १०.५३ शुभमुहूर्त आहे. तर दुपारी ३.०७ ते ४.३२ लाभ मुहूर्त असून, दुपारी ४.३२ ते ५.५७ पर्यंत अमृत मुहूर्त आहे.
आज धन्वंतरी पूजन ; घरोघरी धन-धान्य पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:19 AM