सप्तशृंगगड : नवरात्रोत्सवासाठी सज्ज; भाविकांमध्ये उत्साह
कळवण : उत्तर महाराष्टÑाचे आराध्यदैवत व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (दि. २१) प्रारंभ होत असून, उत्सवासाठी प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली आहे.सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व ग्रामपंचायत नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले असून, यात्रा कालावधीत खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नांदुरी येथून गडावर जाण्यासाठी अवघ्या पाच पाच मिनिटाला परिवहन महामंडळाच्या बसेस भाविकांसाठी उपलब्ध असणार आहेत. भाविकांची सुरक्षाविषयक जबाबदारी पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. देवीभक्त व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे.राज्याच्या विविध भागातून गडावर येणाºया लाखो भाविकांसाठी सप्तशृंगी निवासिनी देवी न्यासाने धर्मशाळेच्या खोल्या, राजराजेश्वरी इमारतीच्या खोल्या व सभागृह उपलब्ध करून दिले आहे. बसस्थानकाजवळील जागेत चप्पल स्टॅण्डची व्यवस्था करण्यात आली आहे.पहिल्या पायरीपासून मंदिराच्या सभामंडपापर्यंत साफसफाई व रंगरंगोटी करण्यात आली आहे. गाभारा, दरवाजे, चांदीचा महिरप यावर रोशणाई करण्यात आली आहे. भाविकांना पहिल्या पायरीपासून मंदिरापर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. मंदिरात जाण्यासाठी पहिल्या पायरीपासून मंदिरापर्यंत ठिकठिकाणी टप्प्याटप्प्याने बाºया लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना मेटल डिटेक्टर दरवाजे व हॅण्ड डिटेक्टरच्या तपासणीतून जावे लागणार आहे. नारळ फोडण्याची व्यवस्था पहिल्या पायरीजवळ करण्यात आली आहे. तपासणीमुळे गर्दी होऊ नये याची काळजी घेण्याच्या पोलीस यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.बोकडबळी बंदीवर जिल्हाधिकारी ठामश्री सप्तशृंग गडावर बोकडबळी प्रथा बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत ही प्रथा बंद करण्याचेच फर्मान कायम केले. भाविकांची सुरक्षितता व या प्रथेमुळे होणारी पशुहत्या रोखण्यासाठी न्यायव्यवस्थेनेच बंदी घातली असल्याचे सांगत महसूल प्रशासनाने दि. १५ सप्टेंबर रोजी उपविभागीय महसूल अधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीरकेला होता. कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी याबाबत सप्तंशृग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त व व्यवस्थापक, कर्मचारी यांना स्पष्टपणे सांगितले की, देवस्थान ट्रस्टमार्फत बोकडबळी दिला गेला तर संबंधित यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हीच भूमिका वरिष्ठ अधिकारीवर्गानेही ठेवल्याने आता ही प्रथा बंद होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.