तब्बल ५० डिझायनर्सने तयार केलेल्या लाईफस्टाइल उत्पादनांची विक्रीही या प्रदर्शनातून होणार आहे. मोनिका आणि उमेश मध्यान या दोन तरुण डिझायनर्सने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. आता सुत्राने एक मोठी झेप घेतली आहे आणि बऱ्याच वर्षांच्या यशानंतर पहिल्यांदाच संपूर्ण भारतातील टॉप ५० डिझायनर्सना घेऊन नाशिकमध्ये प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
फॅशन आणि जीवनशैली उत्पादनांसाठी सुत्रा हे सर्वात मोठे प्रदर्शन आहे,
सुत्रा ग्राहकांना डिझायनर साड्या, मॅक्सी स्कर्ट, गाऊन, रिसॉर्ट वियर, पार्टी वियर, स्टॉल्स, स्कार्फ्स, हॉलिडे वेअर, शूज, फूटवियर, अॅक्सेसरीज यासह इतर फॅशनेबल उत्पादने सादर करते. पिशव्या, स्लिंग्ज, केसांचे सामान, कानातले, बांगड्या, होम अॅस्थेटिक्स, हस्तकला, दागिने आणि बरेच काही. खरेदीदारांसाठी उपलब्ध असणार आहे.
वेळी देशभरातले सर्वोत्कृष्ट डिझाइनर्स प्रदर्शनात सहभागी असणार आहेत, त्यात रिषभ कलेक्शन, अचिजा, केवाय क्रिएशन, दिव्या हॅन्डलूम, कुल कॉटन आणि इतर काही नावाजलेले ब्रँड असणार आहेत.