आज सकाळी आंदोलन
विद्यार्थिनींकडून फी घेऊन त्यांना प्रवेश आणि परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या मुलींचे वर्ष आणि पैसे वाया जाणार आहे. विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता के. जे. मेहता शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणार.
- प्रशांत दिवे, प्रभाग सभापती
--इन्फो--
चौकट
गोंधळाचे अनेक प्रकार
देवळाली गावातील सृष्टी व श्रुती टाकळकर या दोघी बहिणींनी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. श्रुतीकडे गॅप सर्टिफिकेट नसल्याने तिचा प्रवेश रद्द झाला. मात्र परीक्षा देणाऱ्या सृष्टीऐवजी तिची बहीण श्रुतीचा फोटो येत आहे. अमिता प्रमोद बागुल ही इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी असून तिला महाविद्यालय मराठी माध्यमामध्ये दाखवतात. त्यामुळे तिने परीक्षेचे पेपर देऊनसुद्धा तिला प्रथम द्वितीय वर्षापासून गैरहजर दाखवण्यात येत आहे. विद्यापीठाने विद्यार्थिनींना एक स्पेशल विषय घेण्यास सांगितला होता. मात्र महाविद्यालयाने विद्यार्थिनींना दोन स्पेशल विषय घ्यायला सांगितले. विद्यार्थिनींनी महाविद्यालयाकडून होत असलेल्या चुकांबाबत वेळोवेळी सांगूनसुद्धा संबंधित प्राध्यापक व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन देतात, अशी विद्यार्थिनींची तक्रार आहे. महाविद्यालयाच्या अजब कारभाराची शिक्षण विभागाने चौकशी करण्याची मागणी होत आहे.