सर्वतीर्थ टाकेद : भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सवानिमित्ताने देशप्रेम व क्रांतिकारकांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी देशभक्तीपर, समाजप्रबोधनाचा कार्यक्रम गीतांचा कार्यक्रमाचे दिनांक २३ ते २९ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, मान्यताप्राप्त आनंदतरंग फाउंडेशन वाघेरे, नाशिक तसेच कलाभूषण शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी कलापथकाद्वारे हा जनजागृती व समाजप्रबोधनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पंचायत समिती, सर्वतीर्थ टाकेद, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक भगूर, खुंटवड नगर, औद्योगिक वसाहत गोंदे दुमाला, वाडीवऱ्हे व हुतात्मा स्मारक नाशिक आदी ठिकाणी सोमवार (दि. २३) ते रविवार (दि. २९) पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी डॉ. जितेंद्र पाणपाटील, व्यवस्थापक, पराग मांदळे, सदाशिव मलखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरराव दाभाडे, शिवाजी गायकर, देवीदास साळवे, नामदेव गणाचार्य, प्रशांत भिसे, दुर्गेश गायकर, पंढरीनाथ भिसे, रामकृष्ण मांडे हे कार्यक्रम सादर करणार आहेत.