नाशिक : विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तथा दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी (दि.८) दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांची व पालकांची उत्स्कु ता शिगेला पोहोचली आहे.नाशिक विभागातून दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील दिशा ठरणार आहे. त्याचप्रमाणे दहावीच्या निकालानंतर अकरावी व तंत्रनिकेत प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ होणार असल्याने विद्यार्थी व पालकांसोबतच विविध शिक्षण संस्थांनाही दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागलेली होती. ही प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून, शनिवारी, दुपारी १ वाजेपासून विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. आॅनलाइन निकालाच्या दुसºया दिवसापासून गुणपडताळणीसाठी १६ जूनपर्यंत व छायांकित प्रतिसाठी २९ जूनपर्यंच निश्चित शुल्कासह अर्ज करण्याची सोय उपलब्ध देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून, अधिक माहितीसाठी विभागीय मंडळाच्या कार्यालयात संपर्क साधता येणार आहे. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दुसºया दिवसापासून पुढील पाच कार्यालयीन दिवसात पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. दरम्यान, मार्च २००९ च्या माध्यमित शालांत प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणीत अथवा गुणांमध्ये सुधारणा करण्यासाठी लगतच्या दोन परीक्षांमध्ये म्हणजेच जुलै-आॅगस्ट २०१९ व मार्च २०२० अशा दोनच संधी श्रेणी/गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहणार आहेत.मोबाइलवरबीएसएनएलधारकांनी MHSSC
आज दहावीचा आॅनलाइन निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 1:15 AM