नाशिक : राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रविवारी (दि.२१) ग्रामीण व शहरी भागात ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आरोग्य विभागाकडे ६ लाख १० हजार ट्रायव्हायलेट लस प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील चार लाख बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपेंद्रस्ािंह कुशवाह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिल्ािंद शंभरकर यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्व अति जोखमीच्या कार्यक्षेत्राकडे विशेष लक्ष देऊन एकही बालक पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहणार नाही, याबाबतच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. पल्स पोलिओ मोहिमेसाठी लागणारे अनुदान जिल्हास्तरावर प्राप्त झाले असून, १५ तालुक्यांना त्यांच्या लसीकरण बुथ, लाभार्थी, घरभेटीच्या टिम, ट्रान्झिट टीम, मोबाइल टिम यांच्या संस्थेनुसार वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ३८ लाख ९७ हजार लोकसंख्येपैकी ४ लाख ३५ हजार बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
आज पल्स पोलिओ मोहीम
By admin | Published: February 20, 2016 10:31 PM