नाशिक : श्रावण शुक्ल पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा तथा रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोमवारी (दि.७) घराघरातील मुली त्यांच्या लाडक्या भाऊरायाला रेशमी धाग्यांच्या माध्यमातून बहिणीच्या प्रेमात बंदिस्त करून घेतानाच जीवनातील सुख-दु:खाप्रसंगी साथ देण्याचे वचनही घेणार आहे. परंतु, यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवसावर चंद्रग्रहणाचे सावट असून, रक्षाबंधनाचे औक्षण व श्रावण पूजनाचा कार्यक्रम सकाळी ११.३० ते दुपारी १.३९ या वेळेत करण्याचा सल्ला ज्योतिष तज्ज्ञांनी दिला आहे.रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी उत्सुक असतात. परंतु यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींकडे भावाच्या हाताला राखी बांधण्यासाठी केवळ २ तास ४५ मिनिटांचा कालावधी असून, त्यातही शुभ आणि मंगलकारी वेळ पाळली तर मात्र अडीच तास हाती लागतील. रविवारी बाजारपेठेत गर्दी दिसून आली. यात सोने, चांदीच्या वस्तू, घड्याळे व कपड्यांच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती.
आज रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 12:42 AM