नाशिक: मिशन बिगीन अंतर्गत जाहिर करण्यात आलेल्या आदेशानुसार सोमवार (दि.५) पासून कन्टन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंट, बार, कॅफे, कॅन्टीन, रिसॉर्ट, क्लब सुरू करण्यास संमती देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.व्यवसाय सुरू करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली असून त्याचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. मार्गदर्शक तत्वानुसार ५० टक्के इतक्याच क्षमतेने हॉटेल्स, फूडकोर्ट, रेस्टॉरंट, बार, सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पर्यटन विभागाच्या आदरातिथ्य क्षेत्रातील विविध रेस्टॉरंट आणि हॉटेलांसाठी असलेल्या आदर्श कार्यप्रणालीच्या आधीन राहून या संदर्भात रविवारी जिल्हाधिकारी मांढरे यांनी आदेश जारी केले आहेत.कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्याच्या सुचना रेस्टॉरंट मालकांना देण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणेच लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात येणार असून सेवा देताना किंवा प्रतिक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सुचना देण्यात आलेल आहेत. ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.प्रवेश करणाºया ग्राहकांना हॅन्ड सॅनिटायझर देखील उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. पेपर नॅपकीन वापरण्याबरोबरच दोन टेबलांमध्ये अंतर ठेवावे, टेबलाचा परिसर निर्जतूक करण्यात यावा, वापरण्यात येणारी भांडी निजंर्तुक करण्यात यावीत अशा अनेक सुचना देण्यात आलेल्या आहेत.--इन्फो--डिजिटल चलनाचा आग्रहबील देण्यासाठी रोखीचा व्यवहार न करता शक्यतो डिजिटल माध्यमाद्वारे चलन देण्याला प्राधान्य देण्याची सुचना करण्यात आली आहे. रोख चलनव्यवहार असल्यास चलनाची हाताळणी काळजीपुर्वक करण्याची दक्षता घेण्याबाबत ग्राहकांना आणि मालकांनाही आवाहन करण्यात आले आहे. काऊंटरवर कॅशिअर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन असावे असेही सुचविण्यात आले आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शन सुचनांचे पालन केले जात नसल्याचे आढळून आल्यास कोणतीही व्यक्ती , संस्था अणि संघटना यांच्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग कायदा , १८९७ आणि या संदभार्तील नियमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी