नाशिक : आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेत दोन फेºया झाल्यानंतर तिसºया फेरीची प्रतीक्षा संपली असून, बुधवारी (दि.१३) आरटीई प्रवेशाची तिसरी सोडत काढण्यात येणार आहे; परंतु तांत्रिक अडचणींमुळे आॅनलाइन सिस्टिमद्वारे पालकांना एसएमएस पाठविले जाणार नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापकांनी पालकांना फोन करून माहिती द्यावी तसेच शाळेच्या नोटीस बोर्डवर यादी प्रदर्शित करावी अशा सूचाना शिक्षण विभागाने केल्या आहे. वेबसाइटच्या होमपेजवरही अर्जाचा क्रमांक टाकून विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती मिळविता येणार असल्याचे शिक्षण विभागाने कळविले आहे. आरटीईच्या २५ टक्के राखीव प्रवेशासाठी जिल्हा परिषद कार्यालयात तिसरी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी व मनपाचे शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी यांच्या कार्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच शाळा मुख्याध्यापकांनाही त्यांच्या लॉगइनवर यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक मनपा क्षेत्रासाठी पोलीस मुख्यालय परिसरातील शाळा क्रमांक १६ मध्येही निवड यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरटीई अंतर्गत आतापर्यंत दोन फेºयांमध्ये तीन हजार ३८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून आरटीईच्या तीन हजार २०२ जागांसाठी बुधवारी (दि. १३) तिसरी सोडत काढली जाणार आहे.तिस-या फेरीसाठी ३ हजार २०२ जागाया सोडतीपूर्वी प्रवेशप्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनाही आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची संधी मिळाली असून, या संधीचा ७०३ विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे आता आरटीईसाठी एकूण ११ हजार ११८ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी प्रथम फेरीत निवड झालेल्या ३००१ विद्यार्थ्यांपैकी २१८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, तर दुसºया फेरीत निवड झालेल्या १९०२ विद्यार्थ्यांपैकी ११९८ प्रवेश पूर्ण झाले असून, आतापर्यंत निवड झालेल्या ४ हजार ९०३ जागांपैकी ३ हजार ३८२ जागांवर प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिसºया फेरीसाठी ३ हजार २०२ जागा उपलब्ध असून, त्यासाठी उर्वरित विद्यार्थ्यांच्या अर्जांमधून बुधवारी सोडत काढण्यात येणार आहे.
आज आरटीईटी तिसरी सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 1:15 AM