घटस्थापना : ग्रामदेवता कालिकेच्या यात्रेला होणार प्रारंभ
नाशिक : आश्विन शुध्द प्रतिपदेपासून अर्थात गुरुवार (दि. २१) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. गुरुवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत भाविकांना घटस्थापना करता येणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घराघरातून घटस्थापना करण्याबरोबरच शहरातील विविध देवी मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाचा अपूर्व उत्साह बघायला मिळत आहे. शहराची ग्राम देवता असलेल्या श्री कालीका देवीच्या यात्रेचा देखील प्रारंभ होणार आहे.घटस्थापनेसाठी सकाळी साडेदहा वाजेपर्यंतचा मुहूर्त उत्तम तर दुपारी १२ वाजेपर्यंत गौण काल असल्याने ज्या भाविकांना उत्तम कालात घटस्थापना करता येत नसेल अशा भाविकांनी माध्यांन्हपर्यंत घटस्थापना करावी असे पुरोहीतांनी सांगितले. श्री कालीका देवी संस्थांच्या वतीने यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली असून पहाटे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. त्याच प्रमाणे त्यांच्या हस्ते भक्तनिवासाचे उदघाटनही होणार आहे. नाशिक मधील पुरातन देवी मंदिर असलेल्या श्री भद्रकाली, सांडव्यावरील देवी मंदिर, गंगापूररोडवरील तुळजा भवानी मंदिर यासह सर्वच देवी मंदिरांमध्ये नवरात्राची तयारी पूर्ण झाली आहे.घटस्थापनेची घरोघर तयारी सुरू असून आज बाजारात खरेदीसाठी झुंबड उडाली होती. घट, फुले तसेच अन्य साहित्य खरेदी करण्यात येत असल्याने रविवार कारंजा ते सराफ बाजार दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती.बंगाली बांधवांच्या दुर्गापूजेला सप्तमीपासून प्रारंभ होणार असून बंगाली बांधवांमध्ये दुर्गा पूजेचा अपूर्व उत्साह बघायला मिळत आहे. शुक्रवारी (दि. २९) नवमी तिथीला नवरात्र उत्सवाचे उत्थापन होणार असून पारणाने या शारदीय नवरात्राची सांगता होणार आहे. बंगाली बांधवांमध्ये नवमीच्या दिवशी तर इतर बांधवांमध्ये दसºयाच्या दिवशी आयुध पूजन करण्यात येणार आहे.झेंडूच्या फुलांचा दर वाढलानवरात्रामुळे झेंडूच्या फुलांना मागणी वाढली असून सुमारे चाळीस रुपये पाव किलो या पद्धतीने झेंडूची विक्री झाली. झेंडूच्या छोट्या फुलांचे भाव दहा रुपयांपासून पुढे होते. सध्या पावसामुळे फूल बाजारावर परिणाम झाला असून पुरेशी फुले नसल्याने दर वाढल्याचे सराफ बाजारातील विक्रेत्यांनी सांगितले.