पंचवटी : रामनवमीनंतर येणाऱ्या कामदा एकादशीला राम व गरुड रथयात्रा काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा असून, या परंपरेनुसार मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ५ वाजता श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे यंदाचे उत्सवाचे मानकरी श्रीकांतबुवा पुजारी यांच्या हस्ते दोन्ही रथांचे पूजन केल्यानंतर त्यांनी आदेश दिल्यावर ओढण्यास प्रारंभ होईल.या रथोत्सवानिमित्त राम व गरु ड रथाची रंगरंगोटी, आकर्षक सजावट करण्यात येऊन रथोत्सव तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.१६) रथयात्रा सुरू होण्यापूर्वी सायंकाळी राममंदिरातून रामाच्या भोगमुर्ती, पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन विधिवत पूजन केले जाईल. त्यानंतर रामाच्या रथ भोगमूर्ती व गरु ड रथात रामाच्या पादुका स्थापन केल्या जाऊन आरती केली जाईल त्यानंतर रामरथ आणि गरुड रथ ओढण्याची जबाबदारी असलेल्या समस्त पाथरवट समाज सरदार रास्ते आखाडा तालीम संघ तसेच अहिल्याराम व्यायाम शाळा मानकऱ्यांना मानाचा गंध लावून उत्सवाचे मानकरी श्रीकांत बुवा पुजारी यांच्या हस्ते मानाचा नारळ दिला जाईल. त्यानंतर दोन्ही रथ एका रांगेत उभे करून बुवांच्या हस्ते आरती केल्यानंतर बुवा रस्त्याच्या दिशेने तोंड करून रथ ओढण्याचे आदेश देतील. त्यावेळी ढोल-ताशांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करून रथयात्रेला पारंपरिक मार्गाने सुरु वात होईल. सुरु वातीला गरु डरथ व त्यापाठोपाठ काहीवेळाने रामरथ ओढण्यास सुरु वात केली जाईल बुवा रथाकडे तोंड करून मार्गक्र मण करतील.रथ मिरवणूक मार्गश्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून निघालेली रथयात्रा ढिकलेनगर, नागचौक, चारहत्ती पूल, काट्यामारु ती चौक, जुना आडगाव नाका येथून वळण घेत गणेशवाडी रस्त्याने गौरी पटांगणापर्यंत काढण्यात येईल रामाचा रथ नदी ओलांडत नसल्याने रामरथ म्हसोबा महाराज पटांगणावर उभा केला जाईल, तर गरु डरथ रोकडोबा, बोहरपट्टी, मेनरोड, सराफ बाजार, बालाजी मंदिर, परिसरातून मिरवण्यात येऊन म्हसोबा महाराज पटांगणावर आणला जाईल त्यानंतर दोन्ही रथ रामकुंड परिसरात नेले जातील.रामरथाचे जंगी स्वागत४जय सीता राम सीता असा जयघोष करीत मालविय चौकातून रामरथ श्रीकाळाराम मंदिर पूर्व दरवाजाकडे निघाला. श्रीराम रथाला सज्ज करून रथोत्सवासाठी नेताना रथाचे मानकरी असलेल्या पाथरवट समाजातर्फे सोमवारी (दि.१५) रामरथाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. श्रीराम रथाला राम रथोत्सव समितीतर्फे यंदा प्रथमच एलईडी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्रीरामाचा रथ ओढण्याचा मान असलेल्या सरदार रास्ते आखाडा तालीम संघ संचलित श्रीराम रथोत्सव समितीने रथ घेऊन जाण्याअगोदर रथोत्सवात मोलाचे सहकार्य करणाºया मान्यवरांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
आज श्रीराम-गरुड रथोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 1:19 AM