नाशिक : धार्मिक महत्त्व असलेल्या शहरात पौराणिक परंपरेत वसंतोत्सवात आनंद देणारा सण म्हणजे होळी.या होळीच्या उत्सवात धूलिवंदनच्या दिवशी शहरातून निघणारी वीरांची मिरवणूक हे खास वैशिष्ट आहे़विविध देवांची वेशभूषा धारण करून हे वीर शहराच्या गंगाघाट व बाजारात मोठ्या थाटात मिरवत असतात़ हे वीर नवसाला पावणारे असतात, अशी नागरिकांची भावना असल्याने घरोघरी त्यांची मनोभावे पूजा केली जाते. बाशिंगे वीर व दाजिबा महाराज वीर हे दोन वीर अत्यंत प्रसिद्ध आहेत़ शुक्रवारी (दि.१) वीरांचे मिरवणूक निघणार असून, त्याचा जल्लोष पहायला मिळणार आहे. होळीच्या दुसºया दिवशी धूलिवंदनाला मानाच्या बाशिंगे वीरांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. यामागे आख्यायिकाही असून, त्यानुसार हे बाशिंगे वीर नवसाला पावणारे असल्याने त्यांची घरोघरी मनोभावे पूजा केली जाते. बुधवार पेठेतून दुपारी दोनच्या सुमारास बाशिंगे वीरांच्या मिरवणुकीला प्रारंभ होतो.
आज पारंपरिक ‘वीर’ मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 2:22 AM