ओझर : महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशन उत्तर महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेतर्फे ‘ओझर श्री २०१८’ या उत्तर विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे रविवारी (दि. २५) सायंकाळी साडेपाच वाजता ओझर गावातील भगवा चौक येथे आयोजन करण्यात आले आहे. पाचही जिल्ह्यांतील सर्व शरीरसौष्ठवपटू, पंच व पदाधिकाºयांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर, संघटनेच्या पदाधिकाºयांनी, आयोजकांनी केले आहे. प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार, अडीच हजार, दोन हजार, पंधराशे आणि एक हजार रुपयांचे रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत, तर बेस्ट पोझरला पाच हजार, मोस्ट इम्पेव्हडला तीन हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे. ‘ओझर श्री २०१८’ किताब विजेत्याला एकतीस हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. वजन तपासणी विश्वसत्य इंग्लिश स्कूल येथे दुपारी ४ ते ५ वाजेदरम्यान घेण्यात येणार आहे. स्पर्धकांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन नाशिक बॉडीबिल्डर अॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या सहकार्याने ओझर फिटनेस झोनचे संचालक हेमंत जाधव, शेखर जाधव, उत्तर महाराष्ट्र संघटक धनंजय काळे यांनी केले आहे.
आज रंगणार ओझर श्री स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:16 AM