त्र्यंबकेश्वर : येत्या शुक्रवारी त्र्यंबक नगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा बोलावण्यात आली आहे. मुख्याधिकारी निवृत्ती नागरे व मुख्य लेखापाल धनश्री पैठणकर यांनी तयार केलेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. आतापर्यंत सध्याचे सेवानिवृत्त मुख्य लेखापाल प्रमोद कुलकर्णी अर्थसंकल्प सर्वसाधारण विशेष अर्थसंकल्पीय सभेपुढे ठेवीत असत. दरम्यान, या अर्थसंकल्पीय सभेत सत्तारूढ आणि विरोधी पक्ष एकमेकांच्या सहकार्याने सहभाग घेणार असल्याने दोन्हीही पक्षांची सामंजस्याची भूमिका राहणार असल्याचे समजते. त्र्यंबक नगरपालिकेतील या टर्ममधील हा चौथा अर्थसंकल्प असून, पुढील वर्षी पाचवा आणि अंतिम अर्थसंकल्प तयार केला जाणार आहे. दरम्यान, पालिकेत फक्त एकत्र मतावर बहुमत असून, अर्थसंकल्पीय सभेत गावाच्या विकासासाठी खर्च करण्याची तरतूद करून ठेवणे त्याचबरोबर उत्पन्नाच्या असलेल्या स्त्रोताबरोबरच अन्यही उत्पन्न वाढीसाठी स्त्रोत शोधणे क्रमप्राप्त आहे. काही बाबींवर खर्चाची तरतूद कमी केली असेल तर त्या तुलनेत उत्पन्न वाढीकडे किंवा जमा बाजूही पाहणे महत्त्वाचे आहे. (वार्ताहर)
त्र्यंबक नगरपालिकेची आज अर्थसंकल्पीय सभा
By admin | Published: February 25, 2016 10:03 PM