नाशिक : शहरात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार असून, पारंपरिक मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूकही काढण्यात येणार आहे. शहरातील अनेक मंडळे दरवर्षी हिंदू तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. त्यानुसार नाशिकमधील शिवभक्त मंडळे फाल्गुन वद्य तृतीय या तिथीला रविवारी (दि. ४) शिवजयंती उत्सव साजरा करणार आहेत. तिथीनुसार शिवजयंती उत्सवात शहरातील सुमारे ५७ मंडळे सहभागी होणार आहेत, तर शहरातील पारंपरिक मार्गाने काढण्यात येणाºया मिरवणुकीत हिंदू एकता, भोईराज मित्रमंडळ, शनैश्चर उत्सव समिती, भोलेहर मित्रमंडळ आदी मंडळांचा सहभाग असणार आहे. वाकडी बारव येथून सुरू होणारी ही मिरवणूक भद्रकाली, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नल, टिळक पथ, रविवार कारंजामार्गे पंचवटी कारंजा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विसर्जित होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. तर शहकात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. तसेच शिवसेना कार्यालयातही शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.
आज तिथीनुसार शिवजयंती मिरवणूक : विविध मंडळांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:03 IST
नाशिक : शहरात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार असून, पारंपरिक मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूकही काढण्यात येणार आहे.
आज तिथीनुसार शिवजयंती मिरवणूक : विविध मंडळांचा सहभाग
ठळक मुद्देफाल्गुन वद्य तृतीय या तिथीला शिवजयंती उत्सवशिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन