शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

नगराध्यक्षपदाचा आज फैसला

By admin | Published: November 29, 2015 10:58 PM

चांदवड : भाजपाचा नगराध्यक्ष, तर शिवसेनेचा उपनगराध्यक्ष होण्याची शक्यता

चांदवड : नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. सोमवारी (दि. ३०) सकाळी ११ ते २ या वेळेत नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार असून, लगेचच उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होईल. यासाठी भाजपा- सेनेच्या वतीने चांदवड तालुका भाजपाचे विद्यमान अध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने अपक्ष उमेदवार देवीदास ऊर्फ राजेंद्र शेलार यांनी अर्ज दाखल केला आहे. गावात नवनवीन अफवांचे पेव फुटले असले, तरी भाजपाचा नगराध्यक्ष व शिवसेनेचा उपनगराध्यक्ष होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण त्यात एक अपक्ष उमेदवाराने भाजपाला पाठिंबा दिल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे. असे असले तरी ऐनवेळी काही चमत्कार होतो की काय, असेही बोलले जात आहे. भाजपा-सेनेचे मिळून आठ व एक अपक्ष उमेदवार गेल्या दहा दिवसांपासून सहलीला गेल्याची चर्चा आहे. निवडणुकीसाठी चांदवड नगरपरिषदेच्या पहिल्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपाला ५, शिवसेना ३, कॉँग्रेस ४, राष्ट्रवादी कॉँग्रेस २ व अपक्ष ३ असे १७ उमेदवार निवडून आल्याने स्पष्ट बहुमत असे झाले नाही. मात्र त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने आता चांदवडचे नगराध्यक्षाचे भवितव्य अपक्षांच्या हाती होते. भाजपा-सेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र आमच्याच पक्षाचा नगराध्यक्ष होईल असा दावा केला होता. दुसरीकडे कॉँग्रेसचे नेते, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसला एकत्र घेत मोट बांधली खरी त्यात जे तीन अपक्ष निवडून आले तेही कोतवाल गटाचेच होते. त्यामुळे बिनधास्त राहिलेले कोतवाल यांना एक अपक्ष उमेदवार त्यांच्याकडे शब्द देऊनही बाजूला गेल्याची चर्चा चांदवड शहरात होत आहे. या घटनेने मात्र कोतवाल गटाला धक्का बसला असला तरी ऐनवेळी काहीही घडू शकते व चमत्कार होऊ शकतो. (वार्ताहर)