नाशिक : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे वितरण गुरुवारी (दि. २८) सकाळी १० वाजता मुंबई-आग्रा रोडवरील हॉटेल एक्स्प्रेस इनमधील रॉयल हॉलमध्ये होणार आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारतो याबाबत गावागावांतील सरपंचांमध्ये उत्सुकता वाढली आहे.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, बीकेटीचे महाराष्टÑातील अॅग्री सेलचे सहायक व्यवस्थापक जुबेर शेख, बीकेटीचे अधिकृत वितरक सूरजधूत, सुयोजित ग्रुपचे संचालक अनिल जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक चेअरमन सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील जयंत पाटील तसेच महिलाराज सत्ता आंदोलनाच्या अमरावती विभागीय समन्वयक, यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या माजी सरपंच अर्चना जतकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.बीकेटी टायर्स या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक तर पतंजली आयुर्वेद सहप्रायोजक आहेत. राज्यात लोकमतने प्रथमच सुरू केलेल्या या उपक्रमास सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील सरपंचांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विविध कॅटेगिरीमध्ये जिल्ह्यातील ३००पेक्षा अधिक सरपंचांनी प्रवेशिका दाखल केल्याने मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. या सोहळ्यास निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.बारकोडिंगने निवडगेल्या १९ फेबु्रवारी रोजी लोकमतच्या नाशिक शहर कार्यालयात झालेल्या ज्युरी मंडळाच्या बैठकीत बारकोड पद्धतीने विविध १३ कॅटेगिरीमधील सरपंचांची निवड निश्चित करण्यात आली असून, ही सर्व नावे गुलदस्त्यात आहेत.
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चा आज वितरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 1:04 AM