नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत मखमलाबाद येथील नियोजित हरित क्षेत्र विकास सर्वेक्षणास शेतकºयांनी विरोध करून हे काम हाणून पाडले. त्यानंतर महासभेतील प्रस्ताव शनिवारी (दि.१९) स्थगित ठेवण्यात आला. त्यापार्श्वभूमीवर दुपारी पुन्हा स्मार्ट सिटीच्या वतीने सर्वेक्षण करण्यास अनुमती मागण्यात आली, परंतु पुन्हा विरोध करण्यात आला. त्याचप्रमाणे या विषयावर तातडीची बैठक रविवारी (दि.२०) बोलाविण्यात आली आहे.दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनी या विषयावर शेतकºयांचे मन वळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, पुन्हा एकदा प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येईल आणि त्यानंतरच या विषयासाठी विशेष महासभा बोलाविण्यात येईल.स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे साडेसातशे एकर क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात शेतकºयांचा विरोध असून, तरीही त्यांनी सर्वेक्षण करण्यास स्मार्ट सिटी कंपनीस मान्यता दिली आहे. तोपर्यंत हा प्रस्ताव महासभेत मंजूर होणार नाही, असे लोकप्रतिनिधी सांगत असताना प्रत्यक्षात मात्र शनिवारी (दि.१९) महासभेत हा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी (दि.१८) शेतकºयांनी सर्वेक्षणाचे काम बंद पाडले होते. त्यानंतर महापौर रंजना भानसी यांची महापालिकेत जाऊन भेट घेतली आणि महासभेतील प्रस्तावास विरोध दर्शविला होता. यावेळी आश्वासन दिल्यानुसार महापौरांनी विषय स्थगित ठेवला आहे.
मखमलाबाद येथील शेतकऱ्यांची आज बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:37 AM