नाशिक : आॅगस्टचा दुसरा आठवडा उलटूनही जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्केही पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची पीक पेरणी वाया जाण्याची तसेच दुबार पेरणीही होण्याची शक्यता मावळल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा मंगळवारी आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाºयांनी सर्व संबंधित खात्याच्या प्रमुखांची बैठक बोलाविली आहे.जिल्ह्यात ९७ टक्के पीक पेरणी झाली असली तरी, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्या-पासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अगोदरच उशिराने मान्सूनचे आगमन झाल्यामुळे पेरण्या लांबणीवर पडलेल्या असताना, आता पिकांना नेमक्या पाण्याची गरज असताना त्याने पाठ फिरविली आहे. पंधरा पैकी ८ तालुक्यांत ५० टक्केही पाऊस झालेला नसल्यामुळे तेथील पिके धोक्यात आली असून, आता पाऊस पडला तरी, दुबार पेरणीची संधीही शेतकºयांना मिळण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील पिण्याचे पाण्याचे स्त्रोत आटू लागल्याने टॅँकरची मागणी वाढली आहे. लोकप्रतिनिधींकडून रोहयो कामांची तसेच टॅँकरची मागणी केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्णात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकाºयांनी कृषी, महसूल, वीज, पाटबंधारे, भूजल सर्वेक्षण, पशुसंवर्धन, खात्याची संयुक्त बैठक बोलविली असून, त्यात पीक परिस्थिती, चाराटंचाई, प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती, टॅँकरने पाणीपुरवठा, धरणातील पाणीसाठा आदी माहिती मागविली आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीचा आज आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:55 AM