नाशिक : नवीन शैक्षणिक वर्षास सोमवारपासून प्रारंभ होत आहे. सुमारे दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर सुरू होणाऱ्या शाळेची घंटा पुन्हा वाजणार आहे. नवा वर्ग, नवे पुस्तके आणि गणवेशही नवा या आनंदात मुले शाळेच्या प्रतीक्षेत आहेत. शाळाही विद्यार्थ्यांच्या आगमनासाठी सज्ज झाल्या आहेत. शाळेत प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांना चॉकलेट आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे. पहिला दिवस आनंददायी करण्यासाठी सरकारने प्रवेशोत्सव संकल्पना अस्तित्वात आणली आहे. नाशिकमधील शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण केली असून, शाळेतील शिक्षकांना सकाळी लवकर शाळेत हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. दाखल झालेले विद्यार्थी आणि उपस्थित शिक्षकांची माहिती शासनाला आॅनलाइन कळविली जाणार आहे. गेल्या आठवडाभरापासून चिमुकल्यांच्या शाळेची जी तयारी केली जात होती ती आता थंडावणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरु वात सोमवारी होत आहे. विद्यार्थ्यांनीही नवी पुस्तके, दप्तर आणि गणवेशाची खरेदी केली असून, शाळेत जाण्यासाठी त्यांचाही उत्साह शिगेला पोहोचला आहे. रविवारी पालकांनी मुलांच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. (प्रतिनिधी)शालेय खरेदीचा ‘सण्डे’४शालेय सुटीचा आज अखेरचा ‘सण्डे’ आपल्या पालकांसोबत बालगोपाळांनी शालेय साहित्य खरेदीमध्ये ‘एन्जाय’ केला. आज सकाळपासून, तर रात्री उशिरापर्यंत शहराची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेला मेनरोड परिसर नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला होता. एकूणच उद्या (दि.१५) शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे नवीन गणवेश नवीन बूट, दप्तर, डबा, बाटली आदि साहित्य खरेदीसाठी पालकांसह बालगोपाळांची झुंबड उडाली होती. संध्याकाळी मेनरोड परिसरात जणू शालेय साहित्य खरेदीचा मेळा भरल्याचे चित्र पहावयास मिळत होते. सर्वच दुकाने हाऊसफुल्ल झाले होते. प्रत्येक जण आपापल्या पाल्यासाठी शालेय साहित्याची खरेदी करण्याच्या लगबगीत होता. स्टेशनरी पाठ्यपुस्तकांच्या दुकाने गजबजली होती.
आज वाजणार शाळेची घंटा
By admin | Published: June 14, 2015 11:39 PM