लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : आजच्या विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात काम करावे, जागतिक पातळीवर देशाचे नाव झळकवावे, आजच्या विद्यार्थ्याने स्वत:मध्ये देशभक्ती रुजवावी आणि आपल्या कृतीतून ती दाखवून द्यावी, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री प्रमोद कराड यांनी केले. प्रसाद मंगल कार्यालय येथे शनिवारी (दि.२२) पार पडलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे. दुसऱ्या देशांमधून आपल्याला तंत्रज्ञान घ्यावे लागते, ही वेळ आपल्यावर येणार नाही, असा निश्चय करीत देशाला स्वयंपूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डॉ. प्रशांत टोपे यांनी प्रास्ताविक केले. पूर्व महानगर मंत्री अमोल अहिरे यांनी मागील वर्षभरात झालेले कार्यक्रम, आंदोलन आणि कामांचा आढावा घेतला. अमित डमाळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. मेळाव्यास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात महानगर मंत्री सागर शेलार, महानगर सहमंत्री रुपेश पाटील, प्रथमेश नाईक, शर्वरी अष्टपुत्रे, महानगर कार्यालय मंत्री ईश्वरराज अहेर, कोषप्रमुख राहुल बच्छाव, वसतिगृह प्रमुख विलास ठाकरे, महानगर व्यवस्था प्रमुख कुणाल काबरा, महानगर विद्यार्थिनी प्रमुख प्रगती पगार, तंत्रशिक्षण गायत्री भांबेरे, वैद्यकीय देवांशु काकाणी, कृषी हर्षल ठाकरे, एसएफडी आदित्य दोंदे, कला मंच सिद्धी मुंदडा, संशोधन जयेश टोपे, सोशल मीडिया गौरव मुंदडा, सेवा वैभव गुंजाळ, सदस्य जिल्हा संयोजक लक्ष्मण भोये, जिल्हा कार्यालयमंत्री सृष्टी चांडक, विभाग संघटन मंत्री सम्राट माळवसकर, प्रा. यशवंतराव केळकर नगरसाठी प्रा. आनंद खरात, नितीन पाटील, स्वामी विवेकानंद नगरसाठी प्रा. दीपा अभोणकर, यश चांडक, डॉ. एपीजे अब्दुल कलामनगरसाठी प्रा. सोनाली हांडगे, दुर्गेश केंगे, छत्रपती शिवाजी महाराज नगरसाठी पंकज धर्माधिकारी, पवन प्रजापती, सावित्रीबाई फुलेनगरसाठी तेजस पाटील यांची निवड करण्यात आली.
आजच्या विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात कार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:10 AM